Quad Summit नंतर सदस्य देशातील नेत्यांनी कॅन्सर मूनशॉट इव्हेंट (Cancer Moonshot Event) मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी कॅन्सरला रोखण्यासाठी 75 लाख डॉलर पॅकेज आणि 4 कोटी व्हॅक्सिन डोसची घोषणा केली आहे. भारताचं व्हिजन 'वन अर्थ वन हेल्थ' आहे. असल्याचंही ते या वेळी म्हणाले आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला आहे. कोविड संकटात आपण इंडो पॅसिफिक साठी क्वाड वॅक्सिन इनिशिएटीव्ह घेतला होता आता आपल्याला आनंद आहे की क्वाड मध्ये आपण सर्व्हायकल कॅन्सर सारख्या समस्येचा एकत्र मिळून सामना करत आहोत.
भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सर ची लस विकसित करण्यात आली आहे. आर्टिफिशिएअल इंटेलिजंस च्या मदतीने नव्या उपचार पद्धतींचा प्रोटोकॉल सुरू करण्यात आला आहे. भारत आपल्या अनुभव आणि नैपुण्याचा फायदा इतरांना देण्यासाठी तयार आहे. आज कॅन्सर केअर मध्ये भारतात अनेक एक्सपर्ट एकत्र काम करत आहेत. या मूनशॉट इनिशिएटीव्ह अंतर्गत मोदींनी 7.5 मिलियन डॉलर्सचे सॅम्पलिंग कीट, डिटेक्शन कीट आणि लसीकरणाच्या मदतीची घोषणा केली आहे. सायलंट किलर समजला जाणार्या या गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जाणून घ्या या काही गोष्टी!
सर्व्हायकल कॅन्सर च्या लढ्यात भारत करणार मदत
My remarks at the Quad Leaders' Cancer Moonshot event. https://t.co/Q9avnKJVs6
— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2024
भारत 40 कोटी व्हॅक्सिनचे डोस GAVI आणि QUAD अंतर्गत देणार आहे. ते म्हणाले, 'हे 4 कोटी लसीचे डोस करोडो लोकांच्या आयुष्यात आशेचे किरण बनतील. तुम्ही बघू शकता, जेव्हा क्वाड कारवाई करते, तेव्हा ती फक्त देशांसाठी नसते, ती लोकांसाठी असते. हे आपल्या मानवकेंद्रित दृष्टिकोनाचे खरे सार आहे.