Sex Power वाढविण्यासाठी तरुणाने खाल्ले बैलाचे औषध; 3 दिवस लिंगाची ताठरता कायम, उपचारासाठी डॉक्टरांना पाचारण
Erection Stimulants for Bulls Used By Man (Photo Credits: Pixabay)

पत्नीला सेक्समध्ये (Sex) संतुष्ट करणे ही एक कला आहे, ज्यांना ते जमले त्यांचे लैंगिक जीवन (Sexual Life) सुखाचे. मात्र ज्यांना हे जमत नाही असे लोक सर्रास बाहेरून काही उत्पादने (Sexual Stimulant) घेऊन आपली सेक्स पॉवर (Sex Power) वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधीकधी ही उत्पादने जीवघेणीही ठरू शकतात. अशाच एका वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत एका पुरुषाला आपल्या लिंगावर उपचार घ्यावे लागले आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, मात्र या व्यक्तीने आपले लैंगिक जीवन सुधारण्यासाठी चक्क बैलांना दिले जाणारे लैंगिक उत्तेजक औषध खाल्ले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या पुरुषाला आपले लैंगिक जीवन सुधारायचे होते. त्याच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला त्याला संतुष्ट करायचे होते. यामुळेच त्याने आपली सेक्स पॉवर वाढवण्यासाठी चक्क बैलांना उत्तेजित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचे सेवन केले. त्यानंतर तब्बल तीन दिवस त्याचे लिंग ताठरल्या (Erection) अवस्थेत होते. त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले. पुढे डॉक्टरांना त्याच्या लिंगावर शस्त्रक्रिया करण्यावाचून काही पर्याय उरला नाही.

ही व्यक्ती मुळची मेक्सिको येथील आहे. मात्र हे औषध विकत घेण्यासाठी तो पूर्व मेक्सिकोच्या वेराक्रूझला गेला. मेक्सिकोमधील वेराक्रूझ प्रदेश हा सेक्स संबंधित ड्रग्स तस्करीसाठी प्रख्यात आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे त्याला रेनोसा येथील रूग्णालयात 270 च्या तज्ञांकडे नेले गेले. डॉक्टरांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्वसामान्यपणे शेतकरी आपल्या बैलांना लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होण्यासाठी जी औषधे देतात ती औषधे या व्यक्तींनी घेतली होती. त्यानंतर तब्बल 3 दिवसांसाठी याचे लिंग ताठरल्या अवस्थेत राहिले. शेवटी त्याच्यावर उपचार करून ते ठीक करण्यात आले.’ (हेही वाचा: सेक्समध्ये आपल्या पार्टनरला खुश ठेवायचे आहे? स्टॅमिना वाढवण्यासाठी ट्राय करा हे सुपरफूड)

प्रीपेझम (Priapism) म्हणजे  काय ?

सरासरी वेळेपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या लिंगाच्या ताठरतेला प्रीपेझम म्हणतात. ही प्रक्रिया वेदनादायकही असू शकते. यावर अनेक उपचार आहेत. मात्र त्वरित उपचार न केल्यास पुरुषाच्या जननेंद्रियांना धोका पोहचू शकतो. त्वरित उपचार पद्धतींमध्ये ‘पुरुषाच्या जननेंद्रियामधून जास्तीत जास्त रक्त प्रवाह काढून टाकणे’ ही पद्धत वापरली जाते. मात्र याचाही फायदा झाला नाही तर, डॉक्टर शस्त्रक्रिया करतात. बर्‍याच वेळा उपचार न झालेले प्रीपेझम इरेक्टाइल डिसफंक्शनससाठी कारणीभूत ठरू शकते.