Virat Kohli's Diet Plan: विराट कोहलीने उघडले आपल्या फिटनेसचे रहस्य, Gym व्यतिरिक्त खाण्यात असतो ‘या’ 7 गोष्टींचा समावेश, वाचा सविस्तर
कोहली डाइट चार्ट (Photo Credit: Instagram)

Virat Kohli's Diet Plan: भारतीय कर्णधाराच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टींचा असतो समावेश? फिट राहण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) काय खातो? काय खाल्ल्यानंतर विराट कोहलीला इतकी ऊर्जा मिळते? काय खाल्ल्यामुळे विराटला धावा करण्याची शक्ती मिळते? हे असे प्रश्न आहेत जे Google वर वारंवार सर्च केले जातात. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देतो, जे आता प्रत्येक खेळाडूच्या रुटीनचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याच्यामुळे आता बीसीसीआय (BCCI) संघातील फिटनेसच्या नियमांबद्दल कडक पवित्रा घेतला आहे. आता अशा खेळाडूंना संघात स्थान दिले जाते जे पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि त्या संबंधित परीक्षेत उत्तीर्ण होतात. दरम्यान, भारतीय कर्णधार विराटने स्वतः आपल्या डायटबद्दल रहस्य उघडले आहे. विराटच्या डायटमध्ये 7 प्रकारच्या गोष्टी असून तो जिममधेही कसून मेहनत घेतो. (Vamika ची झलक दाखवण्याची मागणी करणाऱ्या चाहत्याला Virat Kohli ने दिले 'हे' उत्तर)

तंदुरुस्त राहण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार जिममध्ये घाम गाळतो. तथापि, मैदानावरील बॅटने हल्लाबोल करण्यासाठी ताकद आणि शक्ती आपल्याला मिळू शकत नाही. त्यासाठी योग्य आहार आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विराट अधिक ऊर्जा आणि ताकद मिळवण्यासाठी काय खवट हे जाणून घेणे आवश्यक आहे. इंस्टाग्रामवर यूजर्सच्या प्रश्नांना उत्तर देताना खुद्द भारतीय कर्णधाराने आपल्या डाएटचं रहस्य उघड केलं आहे. विराटला जेव्हा त्याच्या डाएटबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने 7 प्रकारच्या गोष्टींची नावे दिली, ज्याचा वापर दररोजच्या जीवनात आहारात सामान्य नागरिकही घेतात. विराट कोहलीचा डाएट चार्ट खालीलप्रमाणे आहे.

1. भरपूर भाज्या

2 अंडी

3. दोन कप कॉफी

4. डाळ

5. क्विनोआ

6. भरपूर पालक

7. डोसा

फिट आणि मैदानावर हिट राहण्यासाठी भारतीय कर्णधारानं आपल्या दैनंदिन डाएट चार्टचा खुलासा करताना असं म्हटलं आहे की तो या सर्व गोष्टी संतुलित प्रमाणात खातो. क्वारंटाईनमध्ये आपल्या ट्रेनिंगबद्दल विराट म्हणाला की तो याक्षणी तो दिवसातून एकदा फक्त क्रिकेट प्रशिक्षण करतो. त्यानंतर, तो उर्वरित वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालवतो.