सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने आरोग्यासंबंधित विविध आजार बळावतात. मात्र पावसाळ्यात पायांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण पावसाळ्यात पाय जास्त वेळ पाण्यात राहिल्यास अनेकांच्या पायांना भेगा पडल्याचे दिसून येते. त्यामुळे पायांचे सौंदर्य नाहीसे होते.
तसेच पायांना भेगा पडल्याचे लपवण्यासाठी पायात चप्पल सुद्धा बंद प्रकारची घालावी लागते. मात्र असे केल्याने पायांचा भेगा चप्पल काढल्यावर दिसून येतात. त्यामुळे पायाच्या भेगा घालवायच्या असल्यास तुम्ही हे सोपे उपाय करा.
-रात्री झोपण्यापूर्वी पायांना कोणतीही सॉफ्ट क्रिम लावा. त्यामुळे त्वचा मऊ होऊन पायांची होणारी आग कमी होते.
-पावसाळ्यात किंवा कोणत्याहीवेळी पायांना भेगा पडल्यास कडुलिंबाचा पाल्याचा रस पायांना लावा. यामुळे पायांचा भेगा कमी होण्यास मदत होते.
-त्याचसोबत भेगा पडलेल्या ठिकाणी चंदनाचा लेप लावल्यासही त्या कमी होतात.
-लोणी, आंबेहळद आणि मीठ यांचे एक मिश्रण तयार करुन दररोज पायांना लावल्यास आराम मिळतो.
-पायांची काळजी घेण्यासाठी व्हॅसलिन, जैतून तेल आणि बोरिक पावडर एकत्र करुन भेगांमध्ये भरा.
(हेही वाचा-पायांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय!)
पायांची त्वचा मऊ-मुलायम आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचसोबत आहारात व्हिटॉमिन आणि प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा. मात्र अनेक उपायांनी देखील त्वचेचा कोरडेपणा कायम राहत असल्यास तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.