पायांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय !
पायांची काळजी (Photo Credits: Pixabay)

चेहरा, हाताच्या त्वचेपेक्षा पायांची त्वचा अधिक कोरडी असते. पायांची त्वचा कोरडी होणे, सफेद पडणे या समस्या तुम्हालाही जाणवतात का? हिवाळ्यात तर ही समस्या अधिक जाणवते. पण त्याकडे दुर्लक्ष न करता काही उपाय करण्याची गरज आहे.

पायांची त्वचा मऊ-मुलायम आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही खास टिप्स...

# सर्वप्रथम पायांची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे.

# नियमित पेडीक्युअर केल्याने पायांची त्वचा मऊसूत राहण्यास मदत होते.

# अंघोळ केल्याने पायांना मॉश्चराईजर लावा. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

# रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्यावर क्रीम, लोशन लावा. पायांची त्वचा मुलायम राहण्यास मदत होईल.

# पायांची त्वचा कोमल राहण्यासाठी आणि इंफेक्शन टाळण्यासाठी व्हिटॉमिन ई युक्त तेलाचा वापर करा.

# आहारात व्हिटॉमिन आणि प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा.

# नखं कापताना त्वचेला ईजा पोहचणार नाही, याची खबरदारी घ्या.

# पायाची त्वचा फारच कोरडी असल्यास अर्धा पाय उघडा ठेवणाऱ्या चपलांऐवजी बूट वापरा.

# अनेक उपायांनी देखील त्वचेचा कोरडेपणा कायम राहत असल्यास तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.