'या' कारणांमुळे लहान मुलांमध्येही बळावतोय मधुमेहाचा धोका !
मधुमेहाची तपासणी (Photo Credit-Pixabay )

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. आजकाल मधुमेह हा आजार सामान्यपणे सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळून येत आहे. 0-14 वयोगटातील मुलांना देखील मधुमेह होण्याची शक्यता असते. कारण त्यांचे शरीर आवश्यकतेनुसार इन्सुलिन बनवू शकत नाही. शरीराला ऊर्जा प्रदान करणारी साखर रक्तात मिसळून भयंकर आजाराचे रुप धारण करते. याचा आजाराचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. न्युट्री एक्टिविनियाचे संस्थापक अवनी कौल यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये या आजाराचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

साधारणपणे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर कोणताही आजार जडतो. तसंच तुमच्या कुटुंबातील कोणाला मधुमेह असल्यास पुढच्या पीढीतील लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते.

गरजेपेक्षा अधिक भूक किंवा तहान लागणे, अंधुक दिसू लागणे, विनाकारण वजन कमी होणे, अधिक थकवा जाणवणे ही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसू लागल्यास मधुमेहाचा धोका वेळीच ओळखावा.

लहान मुलांमधील मधुमेह नियंत्रित ठेवणे अनिर्वाय आहे. त्यासाठी काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. पौष्टीक आहार देणे, नियमित व्यायामाची सवय लावणे यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. अनेकदा इन्सुलिनची कमतरता जाणवते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे श्वासाची गती वाढते, त्वचा-तोंड कोरडे पडते, श्वासाला दुर्गंधी येते, उलटी येते, पोट दुखू लागते. त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वर-खाली होते, याकडे नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.