प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Max Pixel)

सध्याच्या डिजिटल युगामध्ये अगदी लहान वयातच मुलांना सेक्स विषयी बरेच ज्ञान मिळते. तर अनेक जण आपले कौमार्य गमावून बसतात. त्यामुळे त्यांना योग्य वयातच या गोष्टीचे लैंगिक शिक्षणाविषयी योग्य ती माहिती मिळावी यासाठी पॉर्नहब लैंगिक कल्याण केंद्राने (Pornhub's Sexual Wellness Center) आपली पहिली सेक्सविषयी माहिती देणीारी व्हिडिओ सीरिज प्रदर्शित केली आहे. यात तुम्हाला पुरुष वा स्त्री च्या शरीराच्या भागांचे व्हिडिओ बनवून त्याबाबत लैंगिक शिक्षण दिले जाणार आहे. सध्या तरुणांना सोशल साइटवर सेक्स बद्दल अनेक आयडियाज मिळतात. मात्र कधी कधी त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. यासाठी योग्य वेळी त्यांना हे ज्ञान मिळावे म्हणून पॉर्नहबनेच ही नवी व्हिडिओ सीरिज आणली आहे.

पॉर्नहबच्या या व्हिडिओ सीरिजमध्ये सेक्स आणि त्यासंबंधीच्या लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती दिली जाणार आहे. या सीरिजचे 'Pornhub Sex Ed' असे नाव देण्यात आले आहे. यात तुम्हाला इंटरकोर्स, उत्तेजिता, फोरप्ले, यासह गुप्तांगाविषयी देखील माहिती दिली जाणार आहे. हेदेखील वाचा- Birth Control Method: 'कंडोम'शिवाय इतर अनेक पद्धतींनी टाळली जाऊ शकेल गर्भधारणा; जाणून घ्या काही सोपे Contraceptives पर्याय

या व्हिडिओ सीरिजमध्ये 11 व्हिडिओ दाखविण्यात आले आहेत. ज्यात सेक्स एज्युकेशन देण्यात आले आहे. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच हा केवळ शिक्षणाचा भाग नसून यात तुमचे मनोरंजन देखील केले जाणार आहे अशी माहिती पॉर्नहब लैंगिक कल्याण केंद्राने दिली आहे.

या व्हिडिओद्वारे तुम्हाला सेक्स कसे करायचे याबाबतचे व्हिडिओ दाखवले जाणार आहे. ज्यामुळे लैंगिक शिक्षणासंबंधीची योग्य आणि आवश्यक ती माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांच्या मनावर चांगले परिणाम होणार की वाईट हे काही दिवसांतच कळेल.