नो शेव्ह नोव्हेंबर ( फोटो सौजन्य- फेसबुक)

सध्या चालू झालेला नोव्हेंबर महिना हा 'No Shave November '( नो शेव्ह नोव्हेंबर) म्हणून पाळला जातो. त्यामुळे या ट्रेंडचे पडसाद सध्याच्या तरुण मंडळींमध्ये खूप दिसून येत आहे. मात्र या 'No Shave November 'मध्ये संपूर्ण महिनाभर पुरुषमंडळींनी दाढी करायची नसते. तसेच दाढीसाठी तुम्ही जे पैसे वापरता ते कर्करोगग्रस्त रुग्णांना देण्याची संकल्पा या ट्रेंडमध्ये आहे.

'मोव्हेंबर' या संस्थेने या 'No Shave November 'च्या ट्रेंडची सुरुवात केली. तसेच पुरुषांच्या आरोग्यासाठी दाढी हे किती फायदेशीर असते असे या कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे ज्या पुरुषांना दाढी ठेवायला आवडते त्यांच्यासाठी हे वरदानच आहे. त्यामुळे दाढी फक्त कुल लुक नाही तर तुम्हाला काही आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

- पूर्वीच्या काळात तत्वज्ञानी दाढी ठेवत असल्याने त्यांच्या व्यवासयाचे ते प्रतिक मानले जायचे.

-एका कंपनीच्या संशोधनानुसार, दाढी तुमच्या वयाला योग्य न्याय देते. त्याचबरोबर अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव करण्यास ही मदत करते.

-तसेच दाढी पक्त मुलींवर छाप पाडते शिवाय होणाऱ्या धुळीच्या अॅलर्जीपासून दूर ठेवते.

- दाढी रात्री जोमाने वाढते असे काहींचे म्हणणे आहे. मात्र आपल्या पूर्ण शरीराची वाढ रात्रीच्या वेळेस होते. त्यामुळे या गोष्टीवर अजूनही लोकांमध्ये मतभेद दिसून येतात.

- अस्थमा असलेल्या रुग्णांना फायदेशीर मानले जाते. कारण बाहेरची प्रदुषित हवा त्यांच्या नाकावाटे फुफ्फुसात जात नाही.

-तर चेहऱ्याची त्वचा ही अतिसंवेदनशील असल्याने सूर्याच्या घातक किरणांपासून होऊन दाढी वाढवल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचे संरक्षण होते.

- दाढी- मिश्या असणाऱ्या पुरुषांचे व्यक्तीमत्व हे अधिक रुबाबदार दिसते.