Nightfall Remedies: तुमच्याही झोपेत वीर्य बाहेर पडते? जाणून घ्या स्वप्नदोष टाळण्यासाठी काही उपाय
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

स्वप्नदोष (Wet Dreams) म्हणजे वीर्य उत्सर्जन, किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी एक समस्या. वाढीचे वय असताना मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर हार्मोनल बदल होत असतात, त्यामुळे वीर्य उत्सर्जन होते. ही एक नैसर्गिक क्रिया असून ती प्रौढ अवस्थेपर्यंत चालू असते. 80% पेक्षा जास्त पुरुष त्यांच्या आयुष्यात एकदा तरी झोपेच्या वेळी उत्तेजित होतात व वीर्य बाहेर पडते. यामध्ये काहीही चूक नाही. स्वप्नदोषासाठी पुरुषांमधील उच्च टेस्टोस्टेरॉनच्या पातळीसह इतर अनेक कारणे कारणीभूत आहेत. जो पर्यंत स्वप्नदोषामुळे कोणताही लाजीरवाणा प्रसंग उभा रहात नाही तोपर्यंत हे ठीक आहे. मात्र त्यानंतर काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सर्वात प्रथम स्वप्नदोष का होतो हे पाहणे गरजेचे आहे. शरीरातील अतिरिक्त स्पर्म सेक्स केल्याने किंवा हस्तमैथून केल्याने बाहेर पडते. जर तुम्ही या दोघांपैकी काहीच करत नसाल तर ते स्वप्नदोषाद्वारे शरीराबाहेर पडते. मात्र लक्षात घ्या यात काहीची चुकीचे नाही, ही एक नैसर्गिक क्रिया आहे. मात्र ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असेल तर यावर काही पुढील काही उपाययोजना करू शकता.

ताण तणाव कमी करा –

ताणतणावामुळे आयुष्यात बर्‍याच अवांछित समस्या आणि आजार उद्भवतात. आयुष्यातील तणाव स्वप्नदोषासाठीही कारणीभूत ठरू शकतात. यासाठी झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करा. सैल कपडे घाला यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होते.

पाठीवर झोपा -

पाठीवर झोपल्याने अनेक लोकांना स्वप्नदोषाची समस्या कमी होण्यास मदत झाली आहे.

पॉर्न टाळा -

XXX पॉर्न व्हिडिओ आपल्या डोक्यात त्याच प्रतिमा, चित्रे आणि विचार निर्माण करतात. या गोष्टी कदाचित आपण झोपेत असतानाही आपल्या मनात जागृत राहतात व झोपेत वीर्यस्खलन होते. त्यामुळे झोपेआधी शक्यतो अश्लील, लैंगिक कथा, XXX व्हिडिओ पाहणे टाळा.

हस्तमैथुन करा –

हस्तमैथुन केल्याने मनातील अनेक भावना वीर्यावाटे बाहेर पडतात. त्यामुळे रात्री पुन्हा वीर्य बाहेर पडण्याच्या शक्यता कमी असतात. मुख्यत्वे रात्री झोपण्यापूर्वी हस्तमैथुन केल्याने तुम्ही बरेच रिलॅक्स होता, तुमचे मन शांत राहते.

सेक्स करण्याचे प्रमाण वाढवा –

जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमची गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी या समस्येबद्दल बोला. शक्य असल्यास तुम्हा दोघांमधील सेक्सचे प्रमाण वाढवा. वेळोवेळी विर्य बाहेर पडल्याने ते अवेळी झोपेत बाहेर पडणार नाही. (हेही वाचा: Condom Mistakes: कंडोम घालताना पुरुषांकडून होतात चुका; जाणून घ्या गर्भधारणा टाळण्यासाठी कसा वापरावा निरोध)

व्यायाम –

हा देखील स्वप्नदोष कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. व्यायामामुळे शरीर थकते व त्यामुळे चांगली झोप येते. मनात कामुक विचार निर्माण होत नाहीत त्यामुळे स्वप्नात वीर्य बाहेर पडण्याचे प्रमाण फार कमी होते.

या समस्येवर व्यक्तीला नैसर्गिक उपाय हवा असेल तर आयुर्वेदिक वैद्य व्यक्तीला शिलाजीत, वंग भस्म, ब्राह्मरी किंवा जायफळ घेण्याचा सल्ला देतात. मात्र या गोष्टी वैद्यकीय सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)