Unwanted Pregnancy थांबवण्यासाठी महिलांकडे काही ऑप्शन आहेत. मात्र पुरुषांना फक्त कंडोम किंवा नसबंदीचा आधार घ्यावा लागतो. तर वैज्ञानिकांच्यानव्या सर्च नुसार, पुरुष मंडळी सुद्धा आता सहज बर्थ कंट्रोल करु शकतात. चीनच्या वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी असा एक गर्भनिरोधक मार्ग शोधून काढला आहे की, जो सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.(गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी COVID-19 Vaccine सुरक्षित; दुधात लसीचा अंश आढळत नसल्याचे अभ्यासातून समोर)
अमेरिकेतील वैज्ञानिक पत्रिका नॅनो लॅटर्समध्ये वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, त्यांनी पुरुषांसाठी रिवर्सिबल चुंबकिय बायोडिग्रेडेबल नॅनोमॅटरियल्स विकसित केले आहे. हे कमीतकमी 30 दिवसापर्यंत गर्भनिरोधकांचे काम करतात. याची उंदरांवर चाचणी केली असता ती यशस्वी झाली आहे. वैज्ञानिकांच्या मते, उच्च तापमानावर स्पर्मचे प्रोडक्शन होत नाही. यासाटी हा प्रयोग नर उंदरांच्या बाहेरील त्वचेवर करण्यात आला.यापूर्वीचे सर्व शोध हे उच्च तापमानावर नॅनोमेटेरियल्सवर केले होते. जे बर्थ कंट्रोल रुपात इंजेक्शनच्या आधारावर उंदरांवर दिले होते. ही प्रक्रिया अतिशय वेदनादायक होती आणि यामुळे स्किनला अधिक नुकसान सुद्धा झाले होते. हे नॅनोमेटिरियल्स बायोडिग्रेडेबल सुद्धा नव्हते.
नव्या शोधात वैज्ञानिकांनी एक उत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला होता. शोधकर्त्यांनी बायोडिग्रेडेबल आरयन ऑक्साइड नॅनोपार्टिकल्सच्या दोन रुपात परिक्षण केले. ते चुंबकांसह लावून गरम केले जाऊ शकते. एक नॅनोपार्टिकलवर पॉलीइथाइलीन ग्लाइकॉल (PEG) आणि दुसऱ्यावर साइट्रिक अॅसिडचा लेप लावण्यात आला होता. वैज्ञानिकांना असे आढळून आले आहे की, पॉलीइथाइलीन ग्लाइकॉल नॅनोपार्टिकलला उच्च तापमानावर गरम केले जाऊ शकते. मात्र साइट्रिक अॅसिडच्या तुलनेत ते सहज तोडले जाऊ शकत नाही.व्यक्तिवर कोणत्याही प्रकारची चाचणी करण्यापूर्वी त्याची जनावरांवर ट्राइल करणे गरजेचे असते.(Broken Penis ची पहिली धक्कादायक घटना युके मधून समोर; Penile Fracture म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे)
आपल्या प्रयोगासाठी वैज्ञानिकांनी दोन दिवस उंदरांवर साइट्रिक अॅसिड लेपित नॅनोपार्टिकल इंजेक्शन काही वेळा दिले. त्यानंतर चुंबकासह त्याचा वापर केला. चाचणी केल्यानंतर सर्व नॅनोपार्टिकल्सवर 15 मिनिटांसाठी एक ऑप्शन म्हणून चुंबक लावण्यात आले. त्यानंतर संशोधकांनी 104 डिग्री फारेनहाइटच्या तापमानावर गरम केले. पुढे त्यांनी असे म्हटले की, उंदरांवर शुक्राणुजनन जवळजवळ 30 दिवसांठी गारठले गेले. त्यानंतर हळूहळू त्यांचे स्पर्म प्रोडक्शनमध्ये सुधार येऊ लागला. या प्रयोगासाठी सातव्या दिवशी मादा उंदरामधील प्रेग्नंसी थांबली. संशोधकांनी असे ही कळले की, साठाव्या दिवशी या मादा उंदरांमधील प्रेग्नेंसी क्षमता परत आली होती.
वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, हे नॅनोपार्टिकल्स हे चाचण्यांसाठी हानिकारक नाही. त्यांना सहजपणे बाहेर काढले जाऊ शकतात. या चाचणीमधून संशोधकांना अधिक अपेक्षा आहे. वैज्ञानिक पुरुषांसाठी विविध प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्सवर आधीपासूनच काम करत आहेत. अशातच नवा प्रयोग पुरुषांसाठी एक उत्तम ऑप्शन ठरु शकतो.