Broken Penis ची पहिली धक्कादायक घटना युके मधून समोर; Penile Fracture म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Image)

एका 40 वर्षीय व्यक्तीने आपले पेनिज फ्रॅक्चर (Penis Fracture) केल्याचे धक्कादायक घटना युनाडेट किंगडम (United Kingdom) मधून समोर आली आहे. Perineum's Force मुळे पेनिज फ्रॅक्चर झाल्याचे समजत आहे. ही घटना 'Typical Presentation of a Vertical Penile Fracture' या शिर्षकाने बीएमजी केस रिपोर्ट्स (BMJ Case Reports) मध्ये पब्लिश झाले आहे. हा व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असताना ही घटना घडली असून त्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 3 सेमी पर्यंत व्हर्टिकल टीयर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Penile Fracture म्हणजे काय?

बीएमजी केस रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पेनियल फ्रॅक्चर म्हणजे tunica albuginea आणि त्या भोवतालचे corpus cavernosa यामध्ये चीर पडणे. जेव्हा इरेक्ट झालेल्या पेनिजवर abnormal ‘bending’ force पडल्यानंतर tunica albuginea मधील टेनसाईल स्ट्रेंथ वाढून 1500 mm Hg इतका होतो आणि त्यामध्ये चीर पडते. ज्याला फ्रॅक्चर असे म्हणतात.

पेनिजमध्ये होणारे फ्रॅक्चर हे हाडांमध्ये होणाऱ्या फ्रॅक्चरपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. कारण पेनिजमध्ये कोणत्याही प्रकारचे हाड नसते. यासाठी एमआरआय, cavernosography किंवा penile ultrasound चा वापर करुन निदान केले जाते. जास्त जोरात हैस्तमैथून केल्याने, सेक्स करताना अपघात झाल्याने किंवा इरेक्ट पेनिजला अपघात झाल्याने सुद्धा पेनियल फ्रॅक्चर होऊ शकते.

Penile Fracture  ची लक्षणे काय?

# ब्लिडींग.

# स्नॅपिंग साऊंड.

# पॉपिंग साऊंड.

# लघवी करताना त्रास होणे.

# पेनिजमध्ये खूप दुखणे.

# पेनिजच्या जवळील भागावर रॅश येणे.

# पेनिजमधून रक्त निघणे.

# इरेक्शन बंद होणे.

# सूज येणे.

ही लक्षणे दिल्यास तात्काळ डॉक्टरांची भेट घ्यावी. कारण अनेकदा अशा परिस्थितीत सर्जरीची देखील गरज भासते.

BMJ Case Report मध्ये नेमके काय म्हटले आहे?

एकूण 88.5 टक्के पेनियल फ्रॅक्चर हे सेक्स करताना होतात. यामध्ये डॉगी स्टाईल, मॅन ऑन टॉप यांसारख्या पॉजिशनचा समावेश असतो. यासोबतच हस्तमैथून, sleeping prone याचा समावेश आहे. 40 शी मध्ये असलेल्या पुरुषांना हा अपघात होऊ शकतो. या अपघातानंतर पेनिजला सूज येते. यामधील 71 टक्के केसेसमध्ये right corpora फ्रॅक्चर झाल्यामुळे पेनिज डाव्या बाजूला बेंड होते, असे रिपोर्टमध्ये सांगितले आहे.