Nestle: Maggi, KitKat, Nescafe खाताय? नेस्ले कंपनीची60% उत्पादनं आरोग्यास अपायकारक; एका अहवालात खुलासा
Nestle (Photo Credit: PTI)

झटपट बनणारा पदार्थ म्हणजे मॅगी (Maggi). या मॅगीतही अनेकांचा ब्रांड ठरलेला. अनेकजण मोठ्या आत्मविश्वासने सांगतात आम्ही नेस्लेचीच मॅगी (Maggi), किटकॅट (KitKat) खातो आणि नेसकॉफी (Nescafe) पितो. अशा श्रद्धाळू ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वची बातमी आहे. नेस्ले कंपनी (Nestle Company) तयार करत असलेली 60% उत्पादनं ही आरोग्याला अतिशय अपायकारक आहेत. नेस्ले कंपनीचा एक अहवाल पुढे आला आहे. या अहवालात कंपनीने आपली 60% उत्पादनं (Nestle Products ही नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याचे म्हटले आहे. ही उत्पादने अधिक प्रमाणात खाद्यपदारथ आणि ड्रिंक प्रोडोक्ट आहेत. दरम्यान, कंपनीच्या उत्पदनांबाबत आलेल्या अहवालानंतर कंपनीचे शेअर्सही घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

फायनान्शिअल टाईम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, नेस्लेच्या सीनिअर एग्जिक्यूटीव्हची एक बैठक या वर्षाच्या सुरुवातीस पार पडली. या मिटींगमध्ये झालेल्या प्रेजेंटेशनदरम्यान सांगण्यात आले की, कंपनीच्या फूड आणि बेवरेज प्रॉडक्टसच्या केवळ 37% ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटिंग प्रणालीनुसार 3.5% अधिक रेटींग आहे. या प्रणालीनुसार खाद्य पदार्थांना 5 पैकी गुण दिले जातात. बहुतांश इंटरनॅशनल ग्रुप रिसर्चमध्ये या प्रणालीचा वापर केला जातो. (हेही वाचा, मॅगी नूडल्स आरोग्याला धोकादायक? उत्पादनात शिसे असल्याचे नेस्ले कंपनीकडून सुप्रीम कोर्टात मान्य)

दरम्यान, अहवालामध्य म्हटले आह की, नेस्लेनेही हे मान्य केले आह की, त्यांची काही उत्पादने ही कधीही आरोग्यदाई राहिली नाहीत. कंपनीने अनेक प्रयत्न करुनही ही उत्पादने आरोग्यदाई बनविण्यास यश आले नाही. प्रसारमाध्यमांनी अधिक विचारले असता नेस्लेच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला. तत्पूर्वी प्रवक्त्यांनी सांगितले की, कंपनीचा प्रयत्न आहे की, आमची उत्पादने आवश्यक न्यूट्रिशन पूर्ततेचा प्रयत्न करतील जी संदुलीत आहार उपलब्ध करण्यास मदत करतील.

दरम्यान, अद्याप हे स्पष्ट होऊ शकले नाही की, हा अहवाल नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांबाबत काही भाष्य करतो का किंवा भारतातील नेस्ले उत्पादनंही या अहवालातील उल्लेखाप्रमाणे अपायकारक ठरतात का. विशेष असे की, हा अहवाल आल्यानंतर कंपनीने ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून आपली उत्पादने तातडीने विकण्याची ऑफर देणे सुरु केले आहे.