Child Dies After Eating Maggi: उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे मॅगी नुडल्स खाल्ल्याने एका १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर कुटुंबातील आणखी काही सदस्यांना मॅगीमुळे विषबाधा झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मॅगी खाल्लाने मुलाचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 9 मे रोजी घडली. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली आहे. (हेही वाचा- हॉटेलमध्ये अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या तरुणांना अडवणं पडलं महागात,)
मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीत कोतवाली भागातील राहुल नगर चांदिया हजारा गावात घडली. गावातील मणिराज यांची मुलगी सीमा तिचे लग्न डेहराहूनमध्ये झाले. उन्हाळाच्या सुट्टीमध्ये सीमा तिचा मुलगा रोहन, विवेक आणि मुलगी संध्यासह तिच्या माहेरच्या घरी राहायला आली होती. 9 मे रोजी रात्री मणिराजच्या घरी मॅगी बनवली होती. सीमा आणि तिच्या मुलांशिवाय बहीण संजू, वहिनी संजना आणि पत्नी जितेंद्र यांनीही मॅगी खाल्ली. भातासोबत मॅगी खाल्ल्याने त्यांना विषबाधा असावी अशी माहिती समोर येत आहे.
Death By Maggi|
"#मैगी" खाने वाले हो जाएं सावधान"
मैगी-चावल खाने के बाद एक 10 साल बच्चे की मौत, 6 लोगों की हालत बिगड़ी !!#यूपी के #पीलीभीत जिले में फूड प्वाइजन का मामला सामने आया है। इससे पांच लोगों को हालत खराब हो गई और एक बच्चे की मौत हो गई। बताया… pic.twitter.com/ITAoyUiXgv
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) May 11, 2024
तब्येत बिघडल्यावर प्रथम गावातील डॉक्टरांकडून औषध घेऊन सर्वजण घरी गेले. मात्र दुसऱ्या दिवशी 10 मे रोजी सर्वांची तब्येत बिघडू लागली, त्याच दरम्यान सीमा यांचा मुलगा रोहन याच्या पोटात दुखू लागले. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच, कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत शोरमो खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता.