कोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स
Medical Workers (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या नव्या नव्या वेरियंटमुळे नागरिकांसह सरकारची चिंता अधिक वाढली जात आहे. अशातच आता आणखी एक नव्या वेरियंटने एन्ट्री केली आहे. असे म्हटले जात आहे की, हा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे. मुख्य बाब अशी की, व्हायरससंबंधित चीनच्या वुहान लॅबमधील वैज्ञानिकांनी चेतावणी दिली आहे. दरम्यान, 2019 मध्ये वुहान येथूनच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. परंतु हा नवा व्हायरस साउथ अफ्रिका येथे आढळून आला आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, याचे संक्रमण झालेल्या 3 पैकी 1 व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तसेच हा झपाट्याने पसरतो. या नव्या व्हायरसला सध्या NeoCov असे नाव दिले गेले आहे.

रशियातील वृत्तवाहिनीनुसार, स्पुटनिक यांच्या मते NoeCov हा कोणता नवा व्हायरस नाही आहे. तो MERS-CoV व्हायरस संबंधित जोडला आहे. याचा प्रथम शोध 2012 आणि 2015 रोजी मध्य पूर्व देशांमध्ये लागला होता. तो SARS-CoV-2 प्रमाणेच आहे. जसे व्यक्तीला कोरोनाची लागण होते.(Omicron प्रकार त्वचेवर 21 तास आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर तब्बल 8 दिवस जगू शकतो; संसोधनात मोठा खुलासा)

रिपोर्ट्सनुसार सध्या या व्हायरसचे अंश दक्षिण अफ्रिकेतील वटवाघळांमध्ये आढळले आहेत. सध्या हा फक्त जनावरांमध्ये फैलावत आहे. परंतु वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, तो व्यक्तींना सुद्धा होऊ शकतो. बायोरेक्सिव बेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासातून कळते की, NeoCoV आणि PDF-2180-CoV हा व्यक्तींना सुद्धा संक्रमित करु शकतो.

वुहान युनिव्हर्सिटी आणि चाइनीज अॅकेडमी ऑफ सायन्स इंस्टिट्युट ऑफ बायोफिजिक्सच्या संधोशनकर्त्यांनुसार, मानवाच्या शरिरात संक्रमण करण्यासाठी व्हायरसच्या एका म्युटेशनची आवश्यकता असते. शोधाच्या निष्कर्षामध्ये असे म्हटले आहे की, नोवेल कोरोना व्हायरस आणखी एक धोका निर्माण करु शकतो. कारण तो ACE2 रिसेप्टरला कोरोना व्हायरसला वेगळ्या पद्धतीने बांधतो. तर नव्या NeoCoV वर कोणत्याही प्रकारचे औषध किंवा लस सुद्धा उपलब्ध नाही जेणेकरुन त्याच्यापासून बचाव केला जाईल.

चीनच्या रिसर्जरच्या मते, तो अत्यंत धोकादायक आहे. NeoCoV मुळे संक्रमित प्रत्येक 3 पैकी एकाचा मृत्यू होत आहे. तसेच असे ही म्हटले की, कोरोनाच्या तुलनेत हा अधिक वेगाने पसरत आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले की, NeoCoV वर चीनने दिलेल्या एका स्पष्टीकरणानंतर रुसी स्टेट वायरॉलजी अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी रिसर्ज सेंटरच्या विशेतज्ञांनी गुरुवारी एक विधान जाहीर केले होते. विधानात असे म्हटले की. या व्हायरसवर लक्ष ठेवले जात आहे. तसचे या बद्दल अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.