Winter Health Tips:हिवाळ्यात अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी गुणकारी 'कडुलिंब'; जाणून घ्या 10 महत्त्वाचे फायदे
Neem (Photo Credits: Wikimedia Commons)

कडुलिंब (Neem) ही औषधी वनस्पती असून त्याचा उपयोग अनेक आजारांवर होतो. हिवाळ्यात अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी कडूलिंब सर्वात उत्तम आणि गुणकारी अशी वनवस्पती आहे. कडुलिंब हे नावाप्रमाणे चवीला कडू असले तरीही त्याचा फायदे खूपच चांगले आहेत. शरीरातील अनेक व्याधींना विशेष करुन त्वचेसंबंधींच्या आजारांवर कडुलिंब फायदेशीर आहे. रोज कडुनिंबाची दोन कोवळी पान खाल्ली तर आपलं आरोग्य उत्तम राहिलं. याशिवाय कोणताही आजार होणार नाही.

कडुलिंबाची पाने औषधी आणि गुणकारी आहेत. त्यामुळे आपल्या शरीरातील आजारांवर ती रामबाण उपाय ठरते.

कडुनिंबाचे फायदे

1. कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं,पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.

2. कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात.

3. कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये थोडे मध आणि काळी मिरी पावडर घालून घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात.

4. कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले असता कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे हे सर्व आजार बरे होतात. Winter Health Tips: हिवाळ्यात हात-पाय थंड पडत असतील करा हे '4' झटपट उपाय

5. त्वचेचे आजार, संसर्गजन्य रोगांसाठी गरम पाण्यात कडुनिंबाची पान उकळावीत आणि त्या पाण्यानं अंघोळ करावी. कंडुनिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.

6. पित्ताशयाच्या आजारावर सुद्धा कडुलिंबाचा रस उपायकारी आहे . एवढ्या सर्व आजारावर एकट्या कडुलिबांच्या रसापासून मुक्तता मिळते.

7. कडुनिंबाचे पानांचा उपयोग शरीरातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कडुनिंबाच्या पानांचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो.

हेदेखील वाचा- Winter Health Tips: पित्त, अपचन, कफ यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी ठरणा-या चिकूचे काही आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या सविस्तर

8. त्वचेचे आजार, संसर्गजन्य रोगांसाठी गरम पाण्यात कडुनिंबाची पान उकळावीत आणि त्या पाण्यानं अंघोळ करावी. कंडुनिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.

9. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडुनिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुनिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतं.

10. डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर केला जातो.

Winter Health Tips: हिवाळ्यात हात-पाय थंड पडत असतील तर करा हे '4' झटपट उपाय Watch Video

या व्यतिरिक्त घरामध्ये ठेवलं जाणारं धन्य अथवा कडधान्यांचं किडे, उंदीर घुशीपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे किडे, मुंग्या आणि उंदराचा त्रास होणार नाही. धान्यही सुरक्षित राहते.