हिवाळ्यात वातावरणात आलेल्या गारव्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. अशी वेळी आपण आपल्या आहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे. तसे थंडीत कोणतीही फळे खाणे चांगले असते. पण ज्यांना कफ, सर्दी यांसारखे आजार असतील अशा लोकांनी शक्यतो काही पदार्थ वर्ज्य करणे गरजेचे आहे. मात्र ज्यांना चिकू आवडत असेल त्यांनी अगदी मनसोक्तपणे हे फळ खावे. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं.
तसेच हिवाळ्यातील चिकू खाल्ल्याने अनेक शरीरास अनेक फायदे होतात.
1. चिकूतील कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील लोहाचं प्रमाण संतुलित ठेवतं. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते.
2. डोळ्यांसाठी चिकू खाणं फायदेशीर असतं. दृष्टी चांगली होते. यासोबत चिकूतील पोषक तत्व शरीरातील अनेक इन्फेक्शन होण्यापासून दूर ठेवतात.
हेदेखील वाचा- Winter Health Tips: थंडीत नाक चोंदण्यावर करा हे '5' घरगुती उपाय
3. तुम्हाला अपचनाची अथवा गॅसची समस्या असेल तर आवर्जुन चिकूचं सेवन करा.पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते.
4. ताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.
5. छातीत आणि पोटात जळजळल्यासारखे होते. मात्र त्यावर आराम मिळवायचा असेल तर चिकू अतिशय उपयुक्त ठरतो. Health Tips: काळा चहा पिणे या '6' आजारांवर आहे गुणकारी उपाय
6. कफ आणि श्वासनासंबंधी आजार दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो. सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते. चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.
7. शक्यतो चिकूचा मिल्कशेक घेण्यापेक्षा नुसतं फळ म्हणून चिकू खाल्ला तर त्यापासून शरीराला मिळणारे व्हिटॅमिन्स आणि होणारे फायदे अधिक आहेत.
8. हिवाळ्यात चिकूचा आहारात समावेश केला तर पोटाच्या विकारांपासून सुटका मिळू शकते. यासोबतच शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते.
चिकू हे फळ खाल्ल्याने लहान मुलांनाही ताकद मिळते आणि त्यांना झोपही शांत लागते. ज्या लोकांना अशक्तपणा आहे अशा लोकांनी केळं, चिकू यांसारखी फळे खाणे गरजेचे आहे.