भारताला आयुर्वेदाची (Ayurveda) फार मोठी परंपरा आहे. पूर्वीच्या काळी जवळजवळ प्रत्येक रोगावरील उपचारासाठी आयुर्वेदामधील उपचारांचा वापर व्हायचा. यामध्ये विविध प्रकारच्या तेलांचा (Oil) वापर फार मोठ्या प्रमाणावर होत असे. आजही अनेक जर्जर रोगांवर या तेलांनी आपली कमाल दाखवली आहे. मात्र तुम्हाला माहित आहे बेंबी (Bellybutton) आणि तेल यांचे एक विशिष्ट नाते आहे. शरीराच्या विविध व्याधींचे केंद्र हे नाभी किंवा बेंबी असते, त्यामुळे विविध समस्यांवर विविध प्रकारची तेल बेंबीजवळ लावल्याने चमत्कारिक फायदे दिसून येतात. आपली प्रत्येकाच्याच घरात ही तेले आढळून येतात, चला तर पाहूया कोणत्या तेलामुळे नक्की कोणत्या व्याधी दूर होतात.
पिंपल, चेहऱ्यावरील डाग – तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक मुला मुलीला ही समस्या उद्भवते. यासाठी कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून, थोडय़ा थेंबांनी बेंबीभोवती मालीश करा. यामुळे चेहरा डाग विरहीत होण्यास मदत होईल.
सांधेदुखी, ओठ फाटणे- यासाठी राई किंवा मोहरीचे दोन तीन थेंब तेल बेंबीत टाकावेत व दोन थेंब बेंबीजवळ लावावेत (हेही वाचा: हिवाळ्यात शरीरासाठी उपयुक्त ठरेल आलं-लसणाचं लोणचं, जाणून घ्या हे महत्त्वाचे फायदे)
प्रजनन क्षमता - प्रजनन क्षमतेशी असलेले विकार बरे करण्यासाठी खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टका, काही थेंब बेंबीजवळ लावून हळुवार हाताने मालिश करा.
इतर आजार - मूळव्याध, भगंदर, गॅस, पोट गच्च राहणे, पोटात जडपणा असणे, पोट साफ न होणे, गुडघे दुखणे यासाठी नाभीमध्ये एरंड तेल वापरल्यास फायदा होतो.
चेहरा उजळण्यासाठी – बदामाचे तेल अथवा देशी गाईचे थोडेसे तूप बेंबीत टाकल्याने व बेंबीजवळ मालिश केल्याने चेहरा उजळून अगदी मुलायम होण्यास मदत होते.
सर्दी - कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवल्याने सर्दी खोकल्यावर बराच आराम पडतो.
(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)