Workout (Photo Credits: PixaBay

बदलत्या लाईफस्टाईलचा सरळ सरळ परिणाम होतो तो आपल्या आरोग्यावर. फास्ट फूड खाणे, वेळी-अवेळी खाणे, एकाच जागी बसून काम करणे, शरीराची हालचाल न करणे यांसारख्या अनेक वाईट गोष्टींमुळे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे सध्या फिट राहणे याकडे सर्वांचा कल असतो. त्यासाठी मग जिम लावणे, योगा करणे यांसारख्या ब-याच गोष्टी आपण करतो. जिमला जाताना महिलांना तसेच ब-याच मुलींना मेकअप करुन जाण्याची सवय असते. आपण नेहमी सुंदर दिसावे किंवा वर्कआऊट करतानाचे फोटो काढताना आपले फोटो छान यावेत यासाठी मेकअप करणे हे महिलांचे पहिले काम असते. पण तुम्हाला माहित आहे का असे करणे तुमच्या शरीरासाठी विशेषत: तुमच्या चेह-यासाठी त्रासदायक ठरु शकते.

यामुळे न तुमच्या चेह-यावर त्याचा दुष्परिणाम होईल तर तुमच्या चेह-यावर बरेच बदल झालेलेही जाणवतील. हे बदल नक्कीच तुमचे सौंदर्य कमी करणारे असतील.

चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत हे बदल

1. त्वचेची जळजळ

जर तुमची त्वचा फार जास्त संवेदनशील आणि नाजूक असेल तर तुम्ही व्यायाम करण्याआधी मेकअप करणे चुकीचे आहे. याने तुमच्या त्वचेवर लाल चट्टे येणे, खाज येणे अथवा जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

2. त्वचेवरील छिद्रे मोठी होण्याची शक्यता

चेह-यावरील पोर्स म्हणजेच छिद्रे वर्कआऊट आली मेकअप केल्यास मोठी होण्याची शक्यता असते. ही छिद्रे मोठी झाली तर यामुळे त्वचेचे मोठे नुकसानही होऊ शकते. वर्कआउट करताना ही छिद्रे मोकळी होतात, पण जर ते मोकळे झाले नाहीत, तर ते कालांतराने मोठे होतात, ज्याने त्वचेचे नुकसान होते. सोनाक्षी सिन्हाचा मेकअप करत असताना अक्षयकुमारने केलेल्या या टवाळकीमुळे अक्कीला पडले फटके, पाहा मजेशीर व्हिडिओ

3. सवय बदलता येत नसेल तर प्रॉडक्ट बदला

जर तुम्हाला जिमला मेकअप करुन जाण्याची सवय बदलता येत नसेल तर तुम्ही निदान मेकअप प्रॉडक्ट बदला. नॉन-कोमेडोनजेनिक प्रॉडक्ट्स वापरा. याने तुमच्या त्वचेची छिद्रे बंद होणार नाहीत. जास्त ऑइली बेस्ड मेकअप प्रॉडक्ट्सऐवजी हलक्या प्रॉडक्ट्सचा वापर करा.

या तीन गोष्टी लक्षात ठेवलात तर मेकअपमुळे वर्कआऊट करताना तुमच्या चेह-यावर काही दुष्परिणाम होणार नाही. तशी तुमची त्वचा ही चमकदार राहते. मात्र एकूणच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तु्म्ही जिमला जाताना मेकअप न करणेच जास्त फायद्याचे आहे.