Lucky Foods For 2019: यशस्वी वाटचालीसाठी नववर्षात फायदेशीर ठरु शकतो हा आहार!
Photo courtesy: archived, edited, representative image

Lucky Foods For 2019: सुरु असलेलं वर्ष (2018) संपून अल्पावधीतच 2019 हे नववर्ष (Year 2019) आपल्या आयुष्यात पदार्पण करत आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सालाबादप्रमाणे आपण यंदाही संकल्प केले असतील. आपल्या यशाचा (Success)आलेख वाढण्याच्या दृष्टीने हे संकल्प महत्त्वाचेही असतात. त्यामुळे आपण हे संकल्प कराच पण, 2019 मध्ये आपण खास करुन आपल्या आहाराकडेही लक्ष द्या. आज आम्ही आपल्याला 2019 मध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहाराबाद्दल सांगणार आहोत. अर्थात हा आहार म्हणजे आमचा दावा नव्हे. पण, काही तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज म्हणून तुम्ही याकडे नक्कीच पाहू शकता. नववर्षात तुम्ही आहारात काही विशिष्ट फळे, पदार्थ यांचे सेवन केल्यास आपल्याला लाभ संभवतो. अशा लाभ संभवणाऱ्या पदार्थांबाबत आज आम्ही येथे सांगत आहोत.

डाळींब Pomegranates)

डाळींब हे एक लाभाचे प्रतिक मानले जाते. तुर्की (Turkey) या देशात लाभाबाबत डाळींबाला अधिक मान आहे. डाळींबाचा लाल रंग हा मनाचे प्रतिक मानले जाते. आहारात डाळींबाचा समावेश असल्यास प्रजनन क्षमता वाढीस लागते असेही सांगितले जाते. डाळींबाच्या रसात आणि सालीमध्ये ही काही खास औषधी गणधर्म असतात. जे आपल्या आरोग्याला हितावह ठरतात. त्यामुळे या फळांचा आहारात समावेश कराल तर आरोग्याच्या दृष्टीने 2019मध्ये हे फळ आपल्याला लाभदायक ठरु शकते.

बीन्स (black-eyed beans)

बीन्स हे एक आर्थिक सपन्नता आणि शुभ संकेताचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे दक्षिण अमेरिका (South American) येथे बीन्सला अधिक महत्त्व आहे. अनेक लोग आपल्या आहारात बीन्सचा जाणीवपुर्वक समावेश करतातच. त्यामुळे अशा या बीन्सचा अहारात समावेश करुन तुम्हीही लाभ उठवू शकता.

नूडल्स (Noodles)

नूडल्डस हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा पदार्थ. नूतन वर्षप्रारंभी नूडल्सचा आहारात समावेश असणे हे अत्यंत लाभदाई असल्याचे सांगतात. नुडल्स हे दीर्घायुष्याचे प्रतिक म्हणूनही ओळखले जाते. जर आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त करायचे असेल तर, नुडल्सची टेस्ट पाहण्यास काहीच हरकत नाही.

द्राक्षे (Grapes)

तुम्हाला आहारात हंगामी फळे खायची सवय असेल. तर तुम्ही द्राक्षांना प्राधान्य देऊ शकता. खास करुन 2019 या नववर्षात. नववर्षांच्या प्रारंभी सायंकाळी द्राक्षे खाण्याची काही युरोपीय आणि अमेरिकी देशांमध्येही परंपरा आहे. अशा काळात द्राक्षे खाणे तिकडे शुभ मानले जाते. (हेही वाचा, Year Ender 2018 : यंदा हे '8' सेलिब्रेटीज अडकले विवाहबंधनात !)

मासे (Whole Fish)

तुम्ही मांसाहारी असाल आणि 2018 ला निरोप देत 2019चे स्वागत करण्यासाठी तुम्ही नियोजन करत असाल तर, मासे (Whole Fish)हा छान पर्याय आहे. जगभरातील अनेक ठिकाणी नववर्षाचे स्वागत करताना मासे खाण्याची प्रथा आहे. नव वर्षाच्या प्रारंभी मासे खाणे हे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही मासे खाऊ शकता. पण, अट एकच की तुम्ही खात असलेला मासा हा पूर्ण असायला हवा.