प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Pixabay)

मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांसाठी शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित असले पाहिजे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण योग्यरित्या ठेवण्यासाठी मधुमेह असलेल्या रुग्णांनी आरोग्यदायी आहार घेणे आवश्यक असते.

तसेच कमी साखर असलेले पदार्थ किंवा फळांचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण योग्यरित्या राहण्यास मदत होते. तर पाहूयात कोणती फळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी खाणे उत्तम आहे.

1. संत्र

मधुमेह असलेल्या रुग्णांनी विटामिन सी युक्त फळे भरपूर प्रमाणात खावीत. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्याबरोबर संतुलित राहण्यास मदत होईल. तसेच संत्र्यामध्ये 12 ग्रॅम साखर आणि 70 कॅलरी असते. त्याचबरोबर संत्र्यामध्ये पोटॅशिअम असल्याने उच्च रक्तदाब ही संतुलित राखण्यास मदत होते.

2. द्राक्ष

मधुमेहासाठी पुरेश्या साखरेचा पुरवठा द्राक्षांमधून ही शरीराला केला जातो. द्राक्षांचा समावेश नाश्ता किंवा स्नॅकच्या म्हणून खाऊ शकतात. परंतु जास्त प्रमाणात ही द्राक्ष खाऊ नये. त्यामुळे साखरेचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असते.

3. रासबेरी

रासबेरी मध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असते. तसेच रासबेरीची चव ही अतिशय उत्तम असते. एक कप रासबेरीमध्ये फक्त 5 ग्रॅम साखरचे प्रमाण असते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीरातील ग्लुकोजचे प्रमाणही संतुलित राहते.

4. किवी

प्रत्येकाला गोड आणि आंबट पदार्थ खायला आवडतात. या फळात विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. तर साखरेचे प्रमाण खुप कमी प्रमाणात असते. कीवीमध्ये 6 ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी कीवी हे फळ खाल्ल्यास उत्तम.

5. अ‍ॅव्होकाडो

या फळात साखरेचे प्रमाण फक्त 1 ग्रॅम असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे फळ आरोग्यास अतिशय फायदेशीर असते. अ‍ॅव्होकाडो शरीरातील कॉलोस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करते. तसेच हृदयाशी निगडीत समस्या दूर राहण्यास ही मदत होते.

6. पीच

पीच हे फळ खाल्ल्यास खूप गोड लागते. मात्र साखरेचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असते. पीच मध्ये 13 ग्रॅम साखरेचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल आणि तुम्हाला गोड खायचे असेल तर पीच खाल्ल्यास आरोग्यासाठी उत्तम ठरेल.

7. सफरचंद

आपल्या सर्वांना माहिती आहे की, सफरचंदाच्या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते. परंतु सफरचंदाचा ज्युस न पिता फक्त फळ खाल्ल्यास त्यामधून 19 ग्रॅम साखरेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना सफरचंदाच्या ज्युस न पिता फक्त फळ खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरेल.