List of Dry Days 2021 in India: या दिवशी तुम्हाला देशात कुठेच दारु मिळणार नाही; पाहा तारखेसह संपूर्ण यादी 
Photo Credit : YouTube/Film Stills

2020 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच कठीण वर्ष होते.एकदाचे 2020 वर्ष ला निरोप देऊन आपण 2021 मध्ये पदार्पण केले आहे.आशा आहे की आपण 2021 या वर्षात कोरोना संपुष्टात येईल.मात्र 2021 मध्ये मद्यप्रेमींसाठी एक वाईट गोष्ट आहे. या वर्षात जवळपास प्रत्येक महिन्यात 'ड्राय डे' येत आहेत. आपल्याला माहिती आहेच मद्यविक्रीबाबतच्या कायद्यानुसार (Alcohol Laws in India) 'ड्राय डे' असेल तर त्या संपूर्ण दिवसभरात कोठेही मद्य मिळत नाही. मग ते ठिकाण बिअर बार, पब्ज, देशी दारुचे दुकान असो अथवा इतर कोणतेही. तुम्हाला मद्य काही मिळणार नाही. (वजन कमी करण्याबरोबरच रोज धावल्याने शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या धावण्याचे १० प्रमुख फायदे )

मात्र त्या आधी जाणून घेऊयात ड्राय डे म्हणजे नक्की काय ? आणि हे दिवस काही ठराविक दिवशीच का ठरवलेले असतता? तर त्याचे उत्तर असे आहे की, भारतातील अल्कोहोल कायद्यानुसार ड्रायडे हे विशेष दिवस आहेत जेव्हा दारू विक्रीस परवानगी नसते.उल्लेख केल्याप्रमाणे बहुतेक भारतीय राज्ये हे दिवस महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उत्सव / प्रसंगी पाळतात. ड्राय डे निवडणुका दरम्यान देखील पाळले जातात.तसेच काही ड्राय डे हे वेगवेगळ्या राज्यापुरते मर्यादित असतता जसे छत्रपती शिवजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी ला फक्त महाराष्ट्रात पाळला जातो तसेच गुरु रवी दास जयंती 27 फेब्रुवारी या दिवशी फक्त दिल्लीमध्ये ड्राय डे असतो. पाहूयात या वर्षात कोणकोणते दिवस ड्राय डे म्हणून पाळले जातील.

14 जानेवारी (गुरुवार) मकर संक्रांती

26 जानेवारी (मंगळवार) प्रजासत्ताक दिन

30 जानेवारी (शनिवार) शहीद दिन

19 फेब्रुवारी (शुक्रवार) छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( फक्त महाराष्ट्रात ड्राय डे)

27 फेब्रुवारी (शनिवार) गुरु रविदास जयंती ( फक्त दिल्ली ड्राय डे )

8 मार्च (सोमवार) स्वामी दयानंद सरस्वती जयंती

11 मार्च (गुरुवार) महा शिवरात्रि

२ मार्च (सोमवार) होळी

2 एप्रिल (शुक्रवार) गुड फ्रायडे

14 एप्रिल (बुधवार) आंबेडकर जयंती

21 एप्रिल (बुधवारी राम नवमी)

25 एप्रिल (रविवार) महावीर जयंती

1 मे (शनिवार) महाराष्ट्र दिन (फक्त महाराष्ट्रात ड्राय डे )

12 मे (बुधवार) / 13 मे (गुरुवार) ईद उल-फितर

20 जुलै (मंगळवार) आषाढी एकादशी (फक्त महाराष्ट्रात ड्राय डे)

24 जुलै (शनिवार) गुरु पौर्णिमा (फक्त महाराष्ट्रात,दिल्ली ड्राय डे)

10 ऑगस्ट (मंगळवार) मुहरम

15 ऑगस्ट (रविवार) स्वातंत्र्य दिन

30 ऑगस्ट (सोमवार) जन्माष्टमी

10 सप्टेंबर (शुक्रवार) गणेश चतुर्थी

19 सप्टेंबर (रविवार) अनंत चतुर्थी (फक्त महाराष्ट्रात ड्राय डे)

2 ऑक्टोबर (शनिवार) गांधी जयंती

8 ऑक्टोबर (शुक्रवार) निषेध सप्ताह

15 ऑक्टोबर (शुक्रवार) दसरा

18 ऑक्टोबर (सोमवार) ईद-ए-मिलाद

20 ऑक्टोबर (बुधवार) महर्षि वाल्मीकि जयंती

4 नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळी

14 नोव्हेंबर (रविवार) कार्तिक एकादशी

19 नोव्हेंबर (शुक्रवार) गुरु नानक जयंती

24 नोव्हेंबर (बुधवार) गुरु तेग बहादूर शहीद दिन (फक्त दिल्ली,पंजाब)

आम्हाला आशा आहे या यादीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीण आणि प्रियजनंबरोबर पार्टी करण्याचे दिवस ठरवत असाल तर या यादीचा तुम्हाला उपयोग होईल.