जमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का? सविस्तर जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारतीय परंपरेनुसार जेवताना किंवा अन्न खाताना खाली बसून खावे असे सांगितले जाते. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बसून खाण्यासाठी वेळच मिळत नाही. परंतु उभे राहून खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे बसून खाण्याचा सल्ला दिला जातो.

- घाईघाईमध्ये व्यक्तीकडून जास्त अन्नाचे सेवन जास्त केले जाते. तर उभे राहून खाल्ल्याने ते पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते.

-रोज खाली बसून खाल्ल्याने शरीराची लवचिकता कायम टिकून राहते. तसेच पाठीच्या समस्या कमी होतात.

- बसून खाल्ल्याने व्यक्तीला हवे तेवढे जेवण खाल्ले जाते. परंतु उभे राहून खाल्ल्याने गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

-उभे राहून खाल्ल्याने आपण जास्त झुकले जातो. तसेच स्वत: ला रिलॅक्स वाटण्यासाठी शरीराच्या कोणत्याही एका भागावर जोर दिला जातो. पंरतु बसून खाल्ल्याने स्नायूंची विशिष्ट पद्धतीने हालचाल होणयास मदत होते.

-रक्ताभिरण योग्य रितीने होण्यासाठी खाली बसून खाणे उत्तम. त्याचबरोबर हृदयाच्या तक्रारीसुद्धा उद्भवत नाही.