टीव्ही पाहण्याची सवय ( फोटो सौजन्य - फेसबुक )

सध्याच्या लहान मुलांनमध्ये मोबाईल आणि टीव्ही पाहण्याचे प्रमाण फार वाढत चालले आहे. अशा परिस्थित लहान मुले आपल्या घरातील मंडळींकडे मोबाईल किंवा टीव्ही सातत्याने पाहण्याचा हट्ट धरुन बसतात. मात्र या हट्टापोटी लहान मुलांवर जास्त वेळ टीव्ही पाहिल्यास हा परिणाम होऊ शकतो.

अमेरिकेतील सीएचईओ यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, जी मुले जास्त वेळ टीव्ही आणि स्मार्टफोनवर आपला वेळ घालवतात अशी मुले बुद्धु होण्याची शक्यता असते. तर 'द लँसेट चाइल्ड अँन्ड एडोलेसेंट हेल्थ जर्नल'मध्ये या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करण्यात आला आहे. या प्रकरणी लहान मुलांची बौद्धिक आणि तार्किक क्षमता ही 5 टक्के आढळून आली आहे. तर अशा मुलांना एकाग्रता आणि स्मरणशक्ती संबंधित समस्या उद्भवत असल्याचे ही दिसून आले आहे.

तर या प्रकरणी लहान मुलांच्या मेंदुचा विकास योग्य प्रमाणे होत नसल्याचे ही अभ्यासकांनी सांगितले आहे. त्यामुळे लहान मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवावे, व्यायम करणे अशा आरोग्यदायी सवयी लावणे आवश्यक असल्याचा सल्ला पालकांना दिला आहे.