International Yoga Day 2019:  अनुलोम विलोम आणि ध्यान यांच्यामाध्यमातून दूर ठेवा मानसिक आणि शारिरीक दोष!
Yoga (Photo Credits: Twitter)

जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नियमित एक आसन आणि त्याच महत्त्व सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहे. यामध्ये आज नाडीशोधन प्राणायम म्हणजेच अनुलोम विलोम आणि ध्यान यांचा समावेश आहे. या दोन्हींमध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून शरीरातील दोष कमी करण्यास मदत होते. अ‍ॅनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी आज या दोन्ही योगासनांबद्दल माहिती दिली आहे. International Yoga Day 2019: यंदाचा जागतिक योगदिन 'Yoga For Heart' थीमवर; रांची मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साजरा करणार योगा डे!

पहा कसं कराल अनुलोम विलोम

ध्यान

धकाधकीच्या बनत चाललेल्या आपल्या आयुष्यामध्ये आजकाल चिंतन करणं गरजेचं आहे. ध्यान हे विशिष्ट आसनामध्ये बसून किंवा अगदी खुर्चीवर बसल्याजागीदेखील केलं जाऊ शकतं. यामध्ये आपल्या नकारात्मक विचार आणि गुणांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

यंदाचा योग दिन हा हृद्याचे आजार आणि योगासन असा आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात आवश्यक असणार्‍या मानसिक शांतीसाठी थोडा वेळ काढायला विसरू नका.