अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स (एएमआर)चे वाढते प्रमाण लक्षात घेता जनजागृतीची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन मुंबईच्या माहीम येथील पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून प्रतिजैविक प्रतिकार (AMR) च्या वाढत्या ट्रेंड आणि प्रभावी व्यवस्थापनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी IV इन्फ्युजनमधील नवे म इनोव्हेशन सादर करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एएमआर (AMR) ला मानवतेला तोंड देत असलेल्या जागतिक आरोग्य धोक्यांपैकी एक म्हणून घोषित केले आहे. बॅक्टेरिया, फंगी इत्यादी सूक्ष्मजीवसंस्था जेव्हा सूक्ष्मजीव संसर्गांच्या उपचारार्थ वापरली जाणारी औषधे निष्प्रभ ठरावीत अशा पद्धतीने आपले स्वरूप बदलतात तेव्हा त्या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स अर्थात एएमआर म्हणून ओळखले जाते. याला अँटिमायक्रोबियल ड्रग रेझिस्टन्स असेही म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जगात एएमआरचा सरासरी सर्वाधिक दर भारतात आहेत आणि 2019 मध्ये जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार या संसर्गांमुळे दरवर्षी सुमारे 7,00,000 भारतीयांचा मृत्यू होतो.
पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. जॉय चक्रबोर्ती म्हणाले,अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर)च्या चिंताजनक गतीने होणाऱ्या प्रसाराशी लढण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित भारतातील सर्व लोक एकत्रितपणे काम करत आहेत. सर्व प्रकारची काळजी घेऊनही बऱ्याचदा हे आव्हान हॉस्पिटलमधील प्राथमिक स्वच्छता व आरोग्य व्यवस्थांच्या कक्षेबाहेर आपले हातपाय पसरताना दिसते. पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी हे आयसीएमआरच्या अँटिमायक्रोबियल औषधांशी निगडित समस्यांच्या बाबतीत आघाडीवर राहून काम करणा-या राज्यस्तरीय केंद्रांपैकी एक आहे. शहरातील इथर संस्थांसाठीही ते मार्गदर्शकाचे काम करते
ॲमनीेल हेल्थकेअरच्या इंडिया बिझनेस अँड इमर्जिंग मार्केट्स विभागाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रेसिडंट श्री. श्यामकांत गिरी म्हणाले, “या उद्योगक्षेत्राचे आश्रयदाते या नात्याने हॉस्पिटलमधील संसर्ग आणि अँटिमायक्रोबियल ड्रग रेझिस्टन्स यांचे संक्रमण रोखण्यास मदत करणारे मंच विकसित करणे किंवा त्यासाठी सहयोग साधणे ही आमची जबाबदारी आहे. युनीपोर्ट हा अशाप्रकारचा पहिलाच IV तंत्रज्ञान वापरणारा मंच आहे, ज्याची निर्मिती ॲमनीेलद्वारे भारतासाठी व भारतामध्ये केली जात आहे. यामुळे देशात आयव्ही उपाययोजना पुरविण्याच्या बाबतीत एक नवा मापदंड निश्चित केला जाईल. हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या क्लिनिकल उपचारांच्या व्यवस्थापनासाठी क्लोज्ड इन्फ्युजन यंत्रणांचा वापर करण्याची शिफारस आयएनआयसीसी (इंटरनॅशनल नोसोकॉमिकल इन्फेक्शन कंट्रोल कन्सोर्टियम) द्वारे केली जाते.