Kidney | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

हैदराबाद (Hyderabad) येथील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या मूत्रपींडातून (Kidney) चक्क 206 खडे काढले आहेत. ही शस्त्रक्रिया (Kidney Surgery) करण्यासाठी डॉक्टरांना जवळपास एक तास इतका अवधी लागला. अवेयर ग्लेनीगल्स ग्लोबल रुग्णालयात एका 56 वर्षीय व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया पार पडली. ही व्यक्ती नलगोंडा येथील रहिवासी असून वीरमल्ला रामलक्ष्मैया असे त्याचे नाव आहे. पाठिमागील काही दिवसांपासून त्याला किडणीचा (मूत्रपिंड) त्रास होता. त्यासाठी तो प्रदीर्घ काळापासून एका स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करुन घेत होता. मात्र त्याला आराम मिळत नसल्याने त्याने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावेळ डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.

रुग्णालयातील वरिष्ट सल्लागार डॉ. पूला नवीन कुमार यांनी म्हटले की, सुरुवातीला तपास आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये किडनी आणि डाव्या पाजूला खडे असल्याचे पुढे आले. त्यानंतर इतर तपासण्यांमध्ये सीटी स्कॅनमध्ये किडणीस्टोनची पुष्टी झाली. डॉक्टरांनी म्हटले की, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्याची संमती मिळाल्यावर तब्बल 1 तास शस्त्रक्रिया करुन हे सर्व खडे काढण्यात आले. संपूर्ण शस्त्रक्रिया डॉ. नवीन कुमार, डॉ. वेणू मन्ने, कन्सलटंट यूरोजॉजिस्ट डॉ. मोहन, एनेस्थेसियोलॉजिस्ट आदींच्या सकार्यातून पार पडली. (हेही वाचा, बाबो! पठ्ठ्याने गर्लफ्रेंडच्या आईला किडनी केली दान; 1 महिन्यानंतर तरुणीने दुसऱ्यासोबत थाटला संसार)

शस्त्रक्रियेत सहभागी असलेल्या डॉ. नवीन यांनी म्हटले की, रामलक्ष्मैया शस्त्रक्रियेनंतर ठीक आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. बदलांना प्रतिसादही छान देते आहे. त्याला दोन दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाईल. त्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला जाईल. डॉक्टारांनी म्हटले की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान वाढते. परिणामी नागरिकांमध्ये डीहायड्रेशनची समस्या वाढते. त्यांमुळे किडणी स्टोन वाढण्याची शक्यता अधिक बळावते. नागरिकांनी डिहायड्रेशनपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाणी आणि नारळाचे पाणी अधिक प्रमाणावर पिणे आवश्यक आहे.