![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/30-1.jpg?width=380&height=214)
Summer Hair Care: उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे आपली त्वचा आणि केस अनेकदा निर्जीव होतात. या ऋतूत केवळ आपल्या आरोग्यालाच नाही तर केसांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सूर्य, धूळ आणि घामामुळे केसांमधील ओलावा कमी होतो. तसेच आणि केस कोरडे आणि खराब दिसतात. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे केवळ आरोग्यासोबतचं केसांचे देखील नुकसान होते
सूर्यापासून निघणाऱ्या किरणांमुळे केसांच्या क्यूटिकल्स नष्ट होते. ज्यामुळे केस तुटतात. एवढेच नाही तर सूर्याची उष्णता केसांचा रंग आणि पोत खराब करते. याशिवाय, जास्त उन्हामुळे टाळूवर सनबर्न होऊ शकते. यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात केसांची काळजी व्यवस्थितरित्या घेऊ शकता. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या केसांचे रक्षण करू शकता. (हेही वाचा - Hair Reveal Your Health: तुमचे केस तुमच्या आरोग्याबद्दल काही सांगू पाहतात; ते तुम्हाला कधी जाणवलं आहे का?)
हेअर कट करा -
उन्हाळ्यात लांब केस बाळगणे अनेकदा कठीण होते. अशा परिस्थितीत, तुम्ही केस थोड्या प्रमाणत लहान करु शकता. केस कापण्याचे आणि केस लहान करण्याचे अनेक फायदे आहेत. लहान केसांची काळजी घेणे सोपे आहे. (हेही वाचा, Hair Loss in Women: महिलांना टक्कल पडते का? केसगळतीची कारणे आणि कारणीभूत घटक कोणते? घ्या जाणून)
सीरमचा वापर कमी करा -
जर तुम्हाला या ऋतूत तुमच्या केसांचे संरक्षण करायचे असेल, तर स्ट्रेटनर, ब्लो ड्राय, परमिंग, केराटिन सारखे केसांचे उपचार शक्य तितके टाळा. तुमचे केस तेलकट दिसू नयेत म्हणून, या हंगामात सीरमचा वापर कमीत कमी करा. (हेही वाचा, Why Do Men Go Bald? पुरुषांचे केस का गळतात? त्यांना टक्कल पडण्याची कारणे काय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे)
कंडिशनर लावा -
केसांचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येक वेळी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरा. हे केसांना पोषण देते आणि त्यांना हायड्रेट करते. कंडिशनर केस गळणे कमी करते आणि केस तुटण्यापासून वाचवते.
बाहेर जाताना स्कार्फने केस झाका -
उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी, त्यांना उन्हापासून वाचवणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही स्कार्फची मदत घेऊ शकता. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी डोक्याला स्कार्फ बांधा. त्यामुळे तुमचे केस खराब होण्यापासून वाचतील.
केस घट्ट बांधणे टाळा -
उन्हात तुमचे केस शक्य तितके मोकळे ठेवा. या ऋतूत वेण्या आणि पोनीटेलसारखे घट्ट केशरचना टाळा कारण त्यामुळे केसांना घाम येऊ शकतो, ज्यामुळे कोंडा आणि इतर प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो.
नारळाचं तेल लावा -
उन्हाळ्यात केसांना भरपूर प्रमाणात तेल लावा. उन्हाळ्यातही तेल मालिश फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल मसाज करू शकता, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ देखील वाढते. तुम्हाला हवे असल्यास, केस धुण्याच्या एक तास आधी तुम्ही केसांना तेल लावू शकता.