डबल चीन (Double Chin) म्हणजे आपल्या चेहऱ्याखाली आलेली अतिरक्त चरबी. तर डबल चीनचे प्रमाण अधिक वाढल्यास आपली मान झाकली जाऊन ती दिसत नाही. त्यामुळे चेहरा आणि मान एकच असल्याचे दिसते. डबल चीन येण्याची समस्या ही फक्त वजन वाढलेल्या व्यक्तींमध्येच नाही तर वजन वाढले नसले तरीही दिसून येते. त्यामुळे डबल चीन जर तुम्हाला कमी करायची असेल तर काही घरगुती उपायांनी कमी करता येणार आहे. वाढत्या वयासोबत आपली त्वचा अधिक शिथिल होऊ शकते. त्यामुळेच डबल चीन येण्यास सुरुवात होते.ज्या व्यक्तींच्या परिवाराला डबल चीन असेल त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक दिसून येते. शरिरात अतिरिक्त फॅक्ट जमा झाल्याने त्वचा ताणली जाते. त्यामुळे सु्द्धा डबल चीन येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर बल चीन कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा.(Beauty Tips: मेकअप उतरविण्यासाठी चेह-यावर महागडे प्रोडक्टस लावण्यापेक्षा घरच्या घरी बनवा 'हे' पॅक)
-ग्रीन टी
एक कप ग्रीन टी मध्ये मध टाकून प्यायल्यास कालांतराने तुम्हाला डबल चीनची समस्या हळूहळू कमी होताना दिसून येईल. कारण ग्रीन टी मध्ये कॅटेचिन असून ते अॅन्टीऑक्सीडेंट आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा उत्तम मानली जाते.
-विटामिन ई
एक विटामिन ई कॅप्सुल मधील सर्व तेल काढून तुमच्या डबल चीनच्या येथे लावा. त्यानंतर काही मिनिटे या तेलाने मसाज करा. काही दिवस रात्री हा उपाय केल्यास तुमची डबल चीनची समस्या दूर होण्यास मदत होईल. विटामिन ई हे एक अॅन्टीऑक्सीडेंटचे प्रमुख स्रोत आहे.
-च्विंगम
डबल चीन कमी करण्यासाठी तुम्ही च्विंगम चघळू शकता. च्विंगम चावणे हा एक व्यायाम असून तुमच्या चेहऱ्याखालील डबल चीन कमी होण्यास मदत होईल.
ऐवढच नाही तर डबल चीन कमी करण्यासाठी काही व्यायाम सुद्धा केले जातात. या व्यायाम करण्याचा पद्धतींचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. तसेच आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे सुद्धा फायदेशीर मानले जाते.