कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ही मानवाची पंचेंद्रिये आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहेत. ही पंचेद्रिये ही माणसाच्या शरीररचनेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे त्याची निगा राखणे, स्वच्छ करणे गरजेचे आहे. यात नाक, डोळे, जीभ आणि त्वचा याची स्वच्छ ठेवणे हे सहज शक्य असते सगळ्यात मोठी समस्या असते ती कान (Ear) साफ करण्याची. कानाचा पडदा हा खूप नाजूक आणि पातळ असल्यामुळे कानातील मळ साफ करताना जर चुकून त्या भागाला काही झाले तर तुम्हाला कायमचे बहिरेपणही येऊ शकते. अशा वेळी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
विविध शस्त्रक्रिया करुनही कानातील मळ काढता येतो मात्र ते सर्वांना शक्य नसल्यामुळे आाणि परवडण्यासारखे नसल्याने तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांनी देखील कानातील मळ काढू शकता.
जाणून घ्या '5' घरगुती टिप्स:
1) तेल: ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.
2) कांद्याचा रस : कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो. Health Tips: अळूची पाने खाणे आरोग्यासाठी आहेत खूपच गुणकारी; जाणून घ्या सविस्तर
3) मिठाचे पाणी : गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा.
4) कोमट पाणी: कापूस घेऊन तो पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. काही सेकंदात पाणी बाहेर काढा.
5) हायड्रोजन पॅरॉक्साइड : अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.
कानात मळ असल्याने वेळेवर कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कानांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.