अळूची पाने (Taro Leaf) हे पचनास आणि खूपच चांगली असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. पण याच अळूच्या पानांमध्ये बरेच व्हिटामिन्स आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. इतकच काय तर आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर करण्यासाठी या अळूच्या पानांची भाजी खूपच गुणकारी आहे. काहींना अळू आवडत नाही अशा लोकांनी अळू खावा यासाठी अळूच्या पानांची भाजी, अळूवडी असे पदार्थ बनवून आपण आपल्या घरातल्या अळू खायला घालतो. बाजारांमध्ये सहज उपलब्ध होणारी अळूची पाने शरीरासाठी खूपच गुणकारी आहेत.
अळूच्या पानांचे असे अनेक गुणकारी फायदे आहेत ज्यापासून तुम्ही अजून अजाण असाल.
चला तर मग जाणून घेऊया हे गुणकारी फायदे:
1) अळूची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते तसेच पोटात मळमळणे, पोटदुखी यांसारख्या अळूची पाने खाणे फायदेशीर ठरु शकते.
2) जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्ही अळूची पाने आवर्जून खावीत. कारण यातील पोषकतत्वे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
3) जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव असेल तर तुम्ही अळूची पाने खाऊ शकतात.
4) अळूच्या पाने डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या पानांमध्ये व्हिटामिन A हे भरपूर प्रमाणात असते ज्याचा उपयोग डोळ्यांना होता. अळूच्या पानांचे सेवन केल्याने आपले डोळे तर चांगले राहतीलच पण आपल्या डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होऊन, नंतर म्हातारपणात सुद्धा आपली दृष्टी देखील चांगली राहणार आहे.
5) अळूची पाने खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास देखील कमी होते. त्यासाठी तुम्हाला अळूच्या पानांचे नियमितपणे सेवन करणे आवश्यक आहे.
अळूचे पानांचे इतके गुणकारी फायदे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित झाले असाल. वजन कमी करण्यासाठी देखील अळूची उपयुक्त ठरु शकतात. त्यामुळे तुमच्या पैकी जे लोक अळूची पाने नाकं मुरडत असतील त्यांनाही हे फायदे अवश्य सांगा.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)