Health Benefits Of Amla: बहुगुणी आवळ्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
Amla (PC - pexels)

Healthy Benefits Of Amla: बाजारात सहजासहजी मिळणाऱ्या आवळ्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग केला जातो. आवळ्यामध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदामध्येदेखील आवळ्याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. आवळ्याला हिंदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये 'एम्ब्लिका मायरोबेलान' या नावाने ओळखले जाते.

आवळ्याची चव आंबट आणि तुरट असते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने केस, त्वचा आणि पोटाचे विकार दूर होतात. आज लेखातून आवळ्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात...(हेही वाचा - पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या)

मधुमेह -

मधुमेहाचा आजार असणाऱ्यांसाठी आवळ्याचे सेवन करण गुणकारी ठरू शकतं. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रीत राहण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारण्यास मदत -

आवळ्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस, ऍसिडिटी, आंबट ढेकर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा गुणकारी ठरतो. तुम्ही आवळ्याचे चूर्ण, लोणचे, ज्यूस आदीचे सेवन करू शकता.

हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत -

आवळ्याचे सेवन केल्याने हृदयविकाराच्या समस्यांपासून तुमची सुटका होते. तसेच हृदयाचे आरोग्य तंदुरुस्त राहते. आवळ्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल प्रमाण नियंत्रीत राहण्यास मदत होते.

वजन कमी होण्यास मदत -

आवळ्याचे सेवन केल्याने तुमचे वजन नियंत्रीत राहण्यास मदत होते. आवळा तुमच्या शरीरातील मेंटबॉलिज्म मजबूत करतो. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

हाडांना मजबूती मिळण्यास मदत - 

आवळा सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांच्या समस्यापासून आराम मिळतो.

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत -

आवळ्याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्याच्या रसाचे नियमितपणे सेवन केल्याने मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेससारख्या समस्या दूर होतात.