Happy Surya Namaskar Day Images and Wishes in Marathi: सूर्याशिवाय सजीव सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक 12 आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे. या योगाभ्यासामुळे शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. दिवसाची सुरुवातत सूर्यनमस्काराने करावी. कारण सूर्यनमस्कार केल्याने मन शांत आणि एकाग्र होते. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, सूर्यनमस्कार हे मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग असावेत. त्यामुळे सहनशक्ती वाढते व चिंता आणि अस्वस्थपणा कमी होतो.
आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर एका देवतेचे नियंत्रण असते असे प्राचीन ऋषी मानत. आपली नाभी सूर्याशी जोडली आहे. म्हणून योगी सूर्यनमस्कार सकाळी करण्यास सांगतात. यावेळी व्हिटामिन ‘डी’ देणारे सूर्यकिरण नाभीवर पडतात. सूर्यनमस्कार व ध्यानाच्या नियमित सरावाने नाभीचा आकार बदामाच्या आकारापासून ते हाताच्या तळव्या इतका होऊ शकतो. तर सूर्यनमस्कार डे निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा!(Surya Namaskar Day 2020: सूर्यनमस्कार करण्याचे 12 प्रकार आणि काय आहेत फायदे, जाणून घ्या)
>>'सूर्यनमस्कार डे'च्या हार्दिक शुभेच्छा!
>>'सूर्यनमस्कार डे'च्या हार्दिक शुभेच्छा!
>'सूर्यनमस्कार डे'च्या हार्दिक शुभेच्छा!
>'सूर्यनमस्कार डे'च्या हार्दिक शुभेच्छा!
>>'सूर्यनमस्कार डे'च्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्यनमस्काराच्या अनेक फायद्यांमुळे शरीर निरोगी आणि मन शांत राहण्यात मदत होते.म्हणूनच सर्व योग तज्ञ सूर्यनमस्काराचा मोठ्याप्रमाणावर पुरस्कार करतात. या सूर्य नमस्कारांच्या सूचनां मुळे तुमचा सूर्यनमस्काराचा अभ्यास चांगला होईल आणि त्यामुळे अधिक चांगले परिणाम साध्य होतील.