केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (World Mental Health Day) टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्स (Tele MANAS) म्हणजेच (टेली-मानस) उपक्रमची 24×7 टेली-मानसिक आरोग्य सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या देशातील 20 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमधून (National Territory) सुरू करण्यात आली असुन लवकरच देशाच्या उर्वरित राज्यांमध्ये सुरु होणार आहे. देशभरात मानसिक आरोग्या (Mental Health) विषयी जागरुकता निर्माम करणे तसेच प्रत्येक रुग्णापर्यत आवश्यक ती सेवा पोहचवणे हे टेली-मानसिक आरोग्य सेवेमागचे उदिष्ट आहे. या टेलिमानसिक सेवांमध्ये समुपदेशन, तज्ञांचा सल्ला आणि ई-प्रिस्क्रिप्शन (E-Prescription) प्रदान करण्यात येणार आहे.
तरी तुम्हाला घरबसल्या या सेवेचा उपभोग घ्यायचा असल्यास हेल्पलाइन नंबर 14416 आणि 1-800-91-4416 वर कॉल (Call) करून तुम्ही सविस्तर महिती मिळवू शकता. कॉलर प्रथम IVRS पर्यंत पोहोचतील, तेथे तुमच्याबाबत प्राथमिक माहिती (Primary Information) घेतल्या जाईल आणि नंतर त्यांच्या क्षेत्रातील प्रशिक्षित समुपदेशकाकडे तुमचा फोन हस्तांतरित केले जातील. आवश्यक असल्यास, तुमचा फोन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचार परिचारिका किंवा मानसोपचार तज्ज्ञांसारख्या मानसिक आरोग्य तज्ञांशी ऑनलाइन माध्यमातून जोडण्यात येईल. (हे ही वाचा:- Mumbai: मुंबईत पसरली डोळ्याची साथ, जाणून घ्या काय आहेत लक्षण आणि कशी घ्याल काळजी?)
फोनवर संवाद साधल्यानंतर रुग्णाची स्थिती बघता वैयक्तिक सेवांची आवश्यकता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तृतीयक काळजी केंद्राकडे पाठवले जाईल. देशातील राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात परवडणारी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स आणि नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्स’ लाँच केले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत ट्विट करत सविस्तर माहिती दिलेली आहे.