Suicidal Thoughts During Teenage: आत्महत्येचा विचार कसा झटकावा? माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सांगीतला किशोरवयातला अनुभव
Milind Deora | (Photo Credits: Facebook)

माजी खासदार आणि काँग्रेस (Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनाही आत्महत्येच्या विचाराचा सामना करावा लागला होता. किशोरावस्थेत आलेल्या आत्महत्येच्या विचारांना कसे तोंड दिले याबाबतचा अनुभव देवरा यांनी ट्विटरच्या माध्यमातून रविवारी (14 जून 2020) कथन केला. हा अनुभव सांगताना मिलिंद देवरा यांनी आत्महत्येच्या विचारांना कशा प्रकारे तोंड द्यावे याबाबत 5 प्रमुख मुद्देही सांगितले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आज (रविवार, 14 जून 2020) आत्महत्या केली. त्यानंतर काही तासांनीच देवरा यांनी ट्विटरद्वारे हा अनुभव शेअर केला.

मिलिंद देवरा यांचे ट्विटः

 

  1. आपल्या कुटूंबाकडे, मित्रांकडे, सहकाऱ्यांशी बोला आणि ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचा. आपल्या माहितीतील सर्व लोकांवर प्रेम करा.
  2. मानसिक आरोग्य सुदृढ राखा. नकारात्मक विचारांपासून सुटका मिळविण्यासाठी समुपदेशकाची मदत घ्या. वय, लिंग, आर्थिक स्तर किंवा यशापेक्षा नैराश्येची पातळी अधिक असते.
  3. आपण आपल्या मनातील भूतांशी सतत संघर्ष करत असतो. त्यामुळे या भूतांना आपल्या मनावर कधीही राज्य करु देऊ नका.
  4. आयुष्य सुंदर आहे. उंदराच्या शर्यतीत (रॅट रेस) अडकू नका. संगीत, अन्न, प्रवास, वाचन, आपले कार्य आणि प्रियजनांसोबत स्वत:ला गुंतवून घ्या. जे तुम्हाला आवडते, ज्यातून तुम्हााल समाधान मिळते अशी गोष्ट करा.
  5. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:वर प्रेम करा. (हेही वाचा, डीप्रेशन: तरुणाईला सोसवेना 'सोशल मीडिया'चा भार; अनेक वेडेपीसे, काहींवर उपचार सुरु)

    बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने मुंबईत राहत्या घरी रविवारी आत्महत्या केली. त्यानंतर काही तासांमध्येच देवरा यांनी ट्विट केलेआहे. राजपूत यांच्या मृत्यूची बातमी समजताच सोशल मीडिया आणि देशातील विविध स्थरातील मान्यवरांना धक्का बसला. अनेकांनी राजपूत याच्या आत्महत्येबाबत आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.