(Photo Credit - Pixabay)

जगभरासह देशात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वेरियंटचा वेगाने फैलाव होत असल्याने विशेषतज्ञांनी या वेरियंट्सवर आपले विचार मांडले आहेत. याच दरम्यान, ICMR च्या सेंटर ऑफ अॅडवान्स रिसर्च इन वायरोलॉजीचे माजी निर्देशक, सेवानिवृत्त प्रोफेसर आणि CMC वेल्लोर मध्ये क्लिनिकल वायरोलॉजी अॅन्ड मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर टी जॅकब जॉन यांनी दावा करत असे म्हटले की, कोरोना हा आपल्यासोबत कायम राहणार आहे. तसेच ओमिक्रॉन आणि डेल्टा वेरियंट हे एकत्रित प्रसारित होऊ शकतात.(Coronavirus Pandemic पूर्वी जोडप्यांना Sex मधून अधिक समाधान मिळत होतं- Study)

डॉक्टर जॅकब जॉन यांनी व्हायरचे संक्रमण कमी करण्यासाठी आणि त्याच्या म्युटेशनच्या माध्यमातून नवे वेरियंट तयार होण्याच्या प्रक्रियेला थांबवण्यासाठी लवकरात लवकर लहान मुलांच्या लसीकरणावर अधिक भर दिला पाहिजे असे म्हटले आहे. मी लसीकरणासह लहान मुलांच्या लसीकरणासाठी पाठिंबा देतो. कारण ते अधिक सुरक्षित आणि प्रभावी आहे. मात्र जर लहान मुलांचे लसीकरण झाले नाही तर त्यांना कोरोनाच्या नव्या वेरियंटचे संक्रमण होऊ शकते. आता सुद्धा ओमिक्रॉनचे संक्रमण लहान मुलांना सुद्धा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच लसीकरणावर भर देण्याची अधिक गरज आहे.

डॉक्टर जॉन हे अन्य वायरोलॉजिस्ट आणि आरोग्य विशेषतज्ञांसोबत गुरुवारी झालेल्या Variants, Vaccines and US च्या मुद्द्यावरील चर्चेत बोलत होते. त्यावेळी लहान मुलांच्या लसीकरणासह बूस्टर डोस आणि आरटी-पीसीआरच्या चाचण्यांचे महत्व सुद्धा मांडले. तसेच कोरोनापूर्वीची परिस्थिती लवकरच तयार होईल अशी कोणतीही शक्यता वाटत नाही. यामुळेच आपल्याला येत्या भविष्यात सुद्धा डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या वेरियंटसोबत रहावे लागणार आहे.(Covid Test at Home: घरीच कोविड19 च्या चाचणीसाठी टेस्ट किटचा कसा वापर कराल? जाणून घ्या येथे अधिक)

NIMHANS मध्ये न्यूरोवायरोलॉजीचे माजी प्रोफेसर आणि SARS-CoV-2, कर्नाटक सरकारच्या जिनोमिक पुष्टीचे नोडल अधिकारी डॉ. रवी यांनी असे म्हटले की, सध्याच्या डेटावरुन कळते की, ओमिक्रॉन हा दोन्ही लसीकरण झालेल्यांमध्ये अधिक दिसून येत आहे. परंतु स्वत:ची काळजी घेणे सुद्धा अधिक महत्वाचे आहे.