Sweet Poison: सिगारेट प्रमाणे साखरेच्या पाकिटावरही धोक्याचा इशारा, आरोग्यास प्रचंड हानिकारक
Excessive Consumption Sugar Dangerous Your Health | (Photo credit: archived, edited, representative image only)

तुम्ही साखर (Sugar) खाता? गोड खाणे आपणास आवडते? याचे उत्तर होय असेल आणि त्याचे प्रमाणही खूप असेल तर वेळीच सावधान! साखर ही आरोग्यास प्रचंड हानिकारक ठरु पाहात आहे. साखर, मीठ आणि मैदा या तिन गोष्टी नागरिकांच्या आरोग्यास स्वीट पॉइजन (Sweet poison) ठरु लागल्या आहेत. म्हणूनच यापुढे साखरेवर सिगारेटच्या (Cigarettes) पाकिटाप्रमाणेच सावधानतेचा इशारा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची येत्या काही काळापासून अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 'राईट टू इट मिशन' राबवले. हे मिशन राबविल्यानंनतर या संस्थेने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भारतामध्ये साखर, मीठ आणि मैदा प्रचंड सेवन केल्यामुळे नागरिकांमध्ये, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या निर्माण होत आहेत. इतकेच नव्हे तर, हे प्रमाण असेच राहिले तर येत्या काळात भारत हा मधुमेहींची राजधानी बनेल, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गंभीर दखल घेत पावले टाकण्याचा विचार केला आहे. (हेही वाचा, World Diabetes Day : जाणून घ्या काय आहेत मधुमेहाची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय)

लोकांमध्ये साखरेबाबत जनजागृती करण्यात यावी यासाठी यापूढे साखरेच्या पाकिटावरही सिगारेटच्या पाकिटाप्रमाणेच सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांना साखरेच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परीणामांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, मधुमेह, कॅन्सर, अस्थमा यांसारख्या आजारांवरील 78 औषधे होणार स्वस्त)

सिगारेटच्या पाकिटावर काय असतो इशारा?

धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे. धुम्रपान केल्याने कर्करोग होऊ शकतो, असा थेट संदेश लाल अक्षरात सिगारेटच्या पाकिटावर लिहिल्याचे दिसते. यापुढे साखरेच्या पाकिटावरही थेट असाच नाही पण, या संदेशाप्रमाणेच तीव्रता दर्शवणारा संदेश साखरेच्या पाकिटावर असणार आहे.