संत्र्याचा ज्यूस प्या, स्मरणशक्ती वाढवा
संत्र्याच्या ज्यूस फायदे (फोटो सौजन्य-Pixabay)

वाढत्या वयोमानानूसार स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वर्तविली जाते. परंतु तुम्हाला जर वृद्धकाळातही तुमची स्मरणशक्ती तल्लक ठेवायची असेल तर संत्र्याचा ज्यूसचे सेवन जरुर करा. तर ज्या व्यक्ती हिरव्या पालेभाज्या, फळे जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांना वृद्धकाळातही स्मरणशक्ती तल्लक राहण्यास मदत होते.

भरपूर प्रमाणात फळे आणि पालेभाज्या खा

एका संशोधनातून कळले आहे की, ज्या व्यक्ती वृद्धवयाच्या 20 वर्षांआधी पासूनच भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्यांचे सेवन करतात त्यांच्यामध्ये स्मरणशक्ती निगडीत समस्या फार कमी प्रमाणात दिसून येतात. तर अशा व्यक्तींनी वृद्धपणी जरी कमी फळे आणि पालेभाज्यांचे सेवन केले तरीही चालते. त्यामुळे विचारशक्ती मजबूत होण्यासाठी या गोष्टींचा उत्तम प्रकारे शरीराला फायदा होतो.

संत्र्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर

ज्या व्यक्ती संत्र्याचा ज्यूसचे सेवन करतात त्यांची विचारशक्ती 74 टक्के अधिक विकसित होते. तसेच संशोधनाच्या माध्यमातून मेंदू निरोगी ठेवण्यासाठी संत्र्याचा ज्यूस पोषक आहार असल्याचे सांगितले आहे.

संत्र्याच्या ज्यूसचे अधिक फायदे

संत्र्यामध्ये सिट्रीक अॅसिड असते ते स्कीनला हायड्रेड ठेवण्याचे काम करते. तसेच सूर्याच्या घातक किरणांपासून वाचवण्यास मदत होते.संत्र्याचा रसामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. त्यामुळे 'क' जीवनसत्त्व खास करून आंबट फळांमध्येच आढळते.