थंडीत प्या आल्याची चहा, रहा तंदूरुस्त
आल्याची चहा (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

थंडीचे दिवस जवळ येत आहेत. तसेच ऋतूमध्ये सातत्याने बदल होत असल्याने आजारपणाला काही वेळा मुकावे लागते. तर बदलत्या ऋतूत आजारांपासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे येत्या थंडीच्या दिवसात मस्त गरमा- गरम आल्याच्या चहाच्या सेवनाने थंडीत होणाऱ्या आजांपासून दूर रहा.

1. सर्दी पासून बचाव

थंडीमध्ये प्रवास करणार असाल तर प्रवासाला निघण्यापूर्वी आल्याची चहा प्यावी. त्यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या सर्दीच्या शंकेचे निरसन होण्यास मदत होते.

2. पचनक्रिया योग्य राहते

आल्याची चहा खाल्लेले अन्न पचवण्यासाठी थंडीत योग्य उपाय आहे. तसेच खाल्ल्यानंतर एक कप आल्याची चहा प्यायल्यास पोटाच्या संबंधित थंडीत होणारे आजार दूर राहतात.

3. शरीरातील हाडांना मजबूतपणा येतो

आल्यामध्ये असणारे आयुर्वेदिक तत्वांमुळे थंडीतत्याची चहा प्यायल्यास पेशी आणि स्नायूंना थंडीच्या काळात मजबूत राहण्यास मदत होते.

4. अॅलर्जींपासून बचाव

थंडीच्या काळात हवेची आद्रता खूप वाढते. तसेच काही वेळेस लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. या दरम्यन आल्याची चहा यावर अत्यंत साधा सोपा उपाय आहे.

5. तणाव कमी होण्यास मदत

ऋतू कोणताही असून दे, लोकांना काही ना काही त्रास असतात. अशा परिस्थित आल्याची चहा काही प्रमाणात तणावपासून दूर राहण्यास मदत करते.

6. रक्ताभिसरण योग्य रितीने होण्यास मदत

थंडीत रक्ताभिसरणाच्या समस्या वाढतात. तसेच आल्यामध्ये असलेल्या विटीमिन, मिनिरल्स आणि अॅमिनो अॅसिड हे थंडीत रक्ताभिसरण क्रियेस मदत करतात. त्यामुळे खास करुन वयोवृद्धांनी या आल्याच्या चहाचे थंडीत सेवन करावे.

7. रोग प्रतिकाराक शक्ती वाढते

लहानांमध्ये ते वयोवृद्धांपर्यंतच्या वयात थंडीत रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वयोवृ्द्धांसाठी आल्याची चहा आणि लहान मुलांसाठी आल्याच्या चहामध्ये मध टाकून दिल्यास शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती थंडीत वाढण्यास मदत होते.