How To Increase Sperm Count: शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी Testicles वर बर्फ लावल्याने होतो का फायदा? जाणुन घ्या
How To Increase Sperm Count (Photo Credits: Pixabay)

लॉक डाऊन (Lockdown) काळात घरबसल्या फार हालचाल नसल्याने, जीवनशैली बदलल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पुरुषांच्या बाबत तर थेट शुक्राणूंवर (Sperm Count) हा प्रभाव जाणवू शकतो. असे होत असल्यास जीवनशैलीत बदल करण्याएवजी बहुतांश मंंडळी ऑनलाईन उपचार शोधण्याचा मार्ग निवडतात, अशा मंडळींंना ऑनलाईनच सर्फिंग करणारी अन्य मंंडळी नानाविध विचित्र सल्ले घरगुती उपायांच्या नावाखाली चिकटवुन देतात. पण एक लक्षात घ्या कशाचाही विचार ना करता असे उपाय करणे महागात पडु शकते. स्पर्म काउंट वाढवण्यासाठी ऑनलाईन सांगितला जाणारा एक पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या Testicles वर बर्फ लावल्यास (नियमित) त्यामुळे शुक्राणंच्या वाढीला मदत होते आता हा उपाय खरंच किती योग्य आहे हे जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नीट वाचा.

How To Increase Sperm Count: शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; जाणून घ्या नैसर्गिक घरगुती उपचार

असंं म्हणतात पुरुषांंचे लिंग अधिक उष्ण वातावरणात असेल तर त्याचा शुक्राणुंंच्या संंख्येवर परिणाम होउ शकतो त्यामुळेच घट्ट अंडरवेअर न वापरण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. तरीही तुमच्या शरीरातील उष्णता अधिक असेल तर तुम्ही बर्फ टेस्टिकल्स ना बर्फ लावण्याचा विचार करु शकता, आतापर्यंत तरी यामूळे कोणालाही वाईट अनुभव आलेला नाही मात्र कुठल्या पाण्याचा बर्फ तुम्ही वापरत आहात हे नीट तपासा अन्यथा संसर्गाचा धोका असतो. ऑनलाईन शेअर केलेल्या अनेक अनुभवांंनुसार 12 दिवसात याचा फायदा होताना दिसु लागतो.

दरम्यान, लिंंग सेंसिटिव्ह असल्यास तुम्ही प्रत्यक्ष बर्फ लावण्यापेक्षा आंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करणे, झोपताना हवेशीर झोपणे, आता घरीच असल्याने दिवसातुन काही तास किंंवा झोपताना अंडरवेअर न घालता झोपणे असे उपाय करु शकता. बर्फ लावायचा झाल्यास आईस पॅक मधुन लावण्याचा सुद्धा विचार करु शकता.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधरे लिहिलेला आहे यास वैदकीय सल्ला समजु नये)