CT Scan (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

CT Scan Causing Cancer: सध्याच्या काळात सीटी स्कॅन (CT Scan) चाचणी खूप सामान्य झाली आहे. कर्करोग, स्ट्रोक आणि अंतर्गत दुखापतींचे निदान करण्यासाठी डॉक्टर याचा वापर करतात. परंतु एका नवीन अभ्यासात डॉक्टरांच्या सीटी स्कॅन तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबित्वाबद्दल इशारा देण्यात आला आहे. जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की जर स्कॅनिंग याच वेगाने सुरू राहिले तर दरवर्षी पाच टक्के नवीन कर्करोगाच्या प्रकरणांसाठी सीटी स्कॅन जबाबदार असतील. सीटी स्कॅन फक्त रेडिएशनद्वारे केले जाते. विज्ञानाच्या जगात असे मानले जाते की, धोकादायक किरणोत्सर्गामुळे कर्करोग होऊ शकतो.

लहान मुलांना जास्त धोका -

रिपोर्टनुसार, सीटी स्कॅनचा धोका कमी असतो, परंतु कोणताही धोका नाही असे म्हणणे योग्य नाही. रुग्ण जितका लहान असेल तितका त्याला धोका जास्त असतो.

मुले आणि किशोरवयीन मुले विशेषतः या धोक्याला बळी पडतात. कारण त्यांचे शरीर अजूनही विकसित होत असते आणि किरणोत्सर्गाचे नुकसान दिसून येण्यास जास्त वेळ लागू शकतो. (हेही वाचा - Vitamin D Deficiency Effect Sex Life: व्हिटॅमिन डी कमतरतेचा लैंगिक जीवनावर परिणाम? काय सांगतो अभ्यास)

स्कॅन अल्कोहोलइतकेच धोकादायक -

सीटी स्कॅनची संख्या या वेगाने वाढत राहिली, तर त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या अल्कोहोल किंवा लठ्ठपणामुळे होणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांइतकीच होऊ शकते. वैद्यकीय जगात अल्कोहोल आणि जास्त वजन हे कर्करोगाचे प्रमुख जोखीम घटक म्हणून ओळखले जातात. (हेही वाचा - Nail Disorders Buldhana: केस आले पण नखं गेली, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये गळतीची विचित्र समस्या)

तथापी, सर्व धोके असूनही डॉक्टर म्हणतात की, सीटी स्कॅन जीव वाचवण्यास मदत करतात आणि बर्‍याच प्रकरणांमध्ये, सीटी स्कॅन करणे आवश्यक असते. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात रोगाचे निदान आणि उपचार करण्यास मदत होते. तसेच खरोखर आवश्यक असेल तेव्हाच त्यांचा वापर केला जाईल याची खात्री करणे देखील आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.