कधी अनावधानाने तर कधी हलगर्जीने आपल्या हातून औषधांच्या बाटल्या (Medicine Bottles) झाकणे उघडी राहून घराच्या एखाद्या कोनाड्यात टाकून दिल्या जातात. या बाटल्या आपल्याला गरज लागली कि आपण पुन्हा शोधून काढतो अतिदक्षता दाखवत यावरील वैधता संपली तर नाही ना याची खात्री करून घेतो पण तोपर्यंत कोपऱ्यात, फ्रीज वर ठेवलेल्या या बाटल्यांवर अगदी सहजपणे आपले लक्ष नसताना कित्येक कीटक बसतात, कुतूहलापोटी ही औषध चाटून पाहतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये औषधाच्या बाटलीचे झाकण काहीसे हलके लागले असून चक्क एक पाल औषधाच्या बाटलीचे झाकण चाटताना पाहायला मिळते.
पहा व्हायरल व्हिडीओ
आपल्यापैकी अनेकजण अत्यावश्यक औषधे घरी साठवून ठेवतात. आपत्कालीन परिस्थितीत याचा खरोखर फायदा सुद्धा होतो पण या औषधांची जागा, स्वच्छता याबाबत खबरदारी न घेतल्यास अशी औषधे तुमचे स्वास्थ्य सुधारण्याऐवजी तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात.त्यामुळे नंतर काळजी करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. ('गाढविणीच्या दुधाचे' आश्चर्यकारक फायदे; गायी, म्हैशीच्या दुधापेक्षाही मानले जाते पौष्टिक, लहान बाळांसाठी ठरू शकते वरदान)
चला तर पाहुयात घरी औषधे साठवून ठेवताना काय काळजी घ्याल?
- आवश्यक औषधे एका बंद डब्यात उष्णता, सूर्यप्रकाश, दमटपणा, पाणी यांपासून दूर व जिथे लहान मुले वा पाळीव प्राणी पोहचू शकणार नाहीत अशाजागी ठेवावीत.
-औषधं ही नेहमी 25°C पेक्षा कमी तापमानाच्या ठिकाणी ठेवावीत. अन्यथा त्या औषधांमधील गुणधर्म कमी होतात.
-औषधे फ्रेज मध्ये ठेवत असाल तर भाज्या किंवा ऍन ठेवण्याचा क्षणात ठेवू नये.
-औषधाच्या गोळ्या, कॅप्सूल्स एवढ्या डब्यात तर द्रव औषधे एखाद्या ट्रे मध्ये ठेवावीत. मलम, बाम यासाठी वेगळा डबा केल्यास उत्तम
-औषधाची अर्धी गोळी घ्यायची झाल्यास पून्हा उघड्या पॅक मध्ये ठेवू नये.
- सिरपच्या बाटल्यांची झाकणे घट्ट लावावीत, तसेच बाटलीच्या कडांना औषध लागलेले नसेल याची खात्री करावी.
- औषधांचे डब्बे एखाद्या वेगळ्या खणात ठेवावेत, याठिकाणी आवश्यक पेस्टकंट्रोल करून घ्यावे.
- औषधांची वैधता तपासून पाहावी, अधिक काळापर्यंत साठवण करून ठेवू नये.
ही खबरदारी घेणे तसे थोडेसे वेळखाऊ काम असले तरी तुमच्या आरोग्यसाठी आवश्यक आहे.
(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)