मधुमेहींना दिलं जाणारं औषधं Metformin यामुळे रक्ताच्या कॅन्सरचा धोका देखील कमी होत असल्याचा अहवाल समोर आला आहे. नुकत्याच जारी मेडिकल संशोधकांच्या अभ्यासामध्ये Metformin च्या अॅन्टी कॅन्सर इफेक्ट बद्दल माहिती देण्यात आली आहे. The Telegraph च्या वृत्तामध्ये दिलेल्या माहितीनुसार, डेन्मार्क मध्ये संशोधकांना जे रूग्ण metformin घेत आहेत त्यांच्यामध्ये myeloproliferative neoplasms (MPNs) चा धोका कमी झालेला दिसून आला आहे. हा आजार ज्यामध्ये bone marrow मोठ्या प्रमाणात लाल रक्त पेशी आणि काही विशिष्ट पांढर्या पेशी, प्लेटलेट्स बनवतात. अहवालात असेही दिसून आले आहे की जेवढ्या जास्त काळ लोकं metformin घेत आहेत तेवढी त्यांची MPNs निर्माण होण्याची क्षमता कमी होत आहे.
American Society of Hematology ने प्रकाशित केलेल्या Blood Advances या जर्नल मध्ये अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष जारी केले आहेत. Aalborg University Hospital in Denmark चे संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक Daniel T. Kristensen यांनी एका मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे की, “5 वर्षांपेक्षा जास्त काळ metformin वापरणार्यांमध्ये औषधांचा परिणाम अधिक दिसून आले आहेत."
MPN ही एकमोठ्या स्तरावरील टर्म आहे ज्यामध्ये क्रॉनिक मायलोजेनस ल्यूकेमिया आणि इतर अनेक दुर्मिळ कर्करोगांचा समावेश होतो. ज्यात लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स किंवा विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशींचा समावेश होतो. यांना इओसिनोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स म्हणतात. या विकारांमुळे अशक्तपणा, संक्रमण, रक्तस्त्राव समस्या आणि थकवा या लक्षणांसह इतर लक्षणे देखील दिसतात. Cancer Early Symptoms: कॅन्सर होण्यापूर्वीची 'ही' 7 महत्वाची लक्षणे, ज्यांना बऱ्याचदा गांभीर्याने घेतले जात नाही .
संशोधकांनी 2010 ते 2018 दरम्यान MPN चे निदान झालेल्या रूग्णांमध्ये मेटफॉर्मिनच्या वापराची तुलना 2010 ते 2018 दरम्यान सामान्य लोकसंख्येतील लोकांशी केली. नमुन्यातील 3,816 MPN रूग्णांपैकी, MPN असलेल्या 268 रूग्णांनी मेटफॉर्मिन घेतले होते जे 19,080 पैकी 1,573 (8.2 टक्के) होते.