Coronavirus Vaccine | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

COVID-19 Vaccine Update: जगभरात कोरोना व्हायरस फोफावत असताना आता त्याला रोखण्यासाठी ठोस उपाय आणि लस शोधण्याचे प्रयत्न वेगवान करण्यात आले आहे. दरम्यान World Health Summit मध्ये याबद्दलचे महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या समीट मध्ये अमेरिकेची Johnson & Johnson ची कोविड 19 वरील संभाव्य लस तातडीची मंजुरी घेऊन सामान्यपणे 2021 च्या जानेवारी महिन्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता बोलून दाखवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आलेले कंपनीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या आता पुन्हा सुरू होण्याच्या तयारीमध्ये आहेत. या वर्षअखेरीपर्यंत सुमारे 60 हजार लोकांवरील अभ्यास आता पुढे येणार आहे. Russian Research Centre मध्ये COVID-19 आणि Flu शी सामना करणारं Combined Vaccine बनवण्याचे प्रयत्न सुरू; जाणून घ्या रशियामधील कोविड 19 लसीबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स.

एकीकडे Johnson & Johnson ने गुड न्यूज दिली आहे तशीच Oxford-AstraZeneca vaccine च्या अहवालामध्येही सकारात्मक माहिती आहे. लंडनमध्ये विकसित होत आलेल्या या लसीचे रिपोर्ट्सही आता जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये निरोगी तरूणांसोबतच वृद्धांमध्येही ही लस सकारात्मक परिणाम देत आहे. आवश्यक रोगप्रतिकारशक्ती निर्माण करत आहे. असा रिपोर्ट Financial Times ने दिला आहे. वयोवृद्धांमध्येही अ‍ॅन्टिबॉडीज आणी टी सेल तयार होत असल्याचं म्हटलं आहे.

सध्या युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आर्यलॅन्ड सह युरोप, जर्मनी मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या समोर येत असल्याने लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत.

भारतामध्ये लंडनच्या Oxford-AstraZeneca vaccine चे कोविशिल्डच्या नावाने सीरम इन्स्टिट्युट मानवी चाचण्या घेत आहेत. भारतामध्ये आता हे अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये मानवी चाचणी सुरू आहेत. बीएमसीच्या रूग्णालयातही आजपासूनच दुसरा डोस सुरू झाल्याने त्याच्या निकालाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. तर कोवॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस देखील 3 र्‍या टप्प्यातील चाचणीला सुरूवात करत आहे.