COVID-19 Treatment: कोरोना बाधितांवर उपचारासाठी संशोधकांकडून नव्या औषधाचा शोध
Drugs. Image Used For Representational Purpose Only. (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध संपूर्ण जग झुंजत आहे आणि हा लढा अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत कोविड-19 (Covid-19) वर ठोस लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. परंतु, कोरोना संसर्गावरील औषधासंबंधित एक सकारात्मक बातमी समोर येत आहे.  संशोधकांनी कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी एका नव्या औषधाचा शोध घेतला आहे. कोविड-19 चे संकट सुरु झाल्यापासून तब्बल वर्षभरानंतर या औषधाचा शोध लागला आहे.

जर्नल सेल्स मधील अभ्यासानुसार, असे समोर आले आहे की, कोविड-19 रोगाचे मुख्य कारण  असलेल्या SARS-CoV-2 विषाणू विरुद्ध protease inhibitor aprotinin चांगले काम करते.  संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, aprotinin aerosols  याचा वापर influenza  विरुद्ध रशियामध्ये केला जातो. त्यामुळे याचा वापर कोविड-19 वरील रुग्णांच्या उपचारासाठी केला जावू शकतो. Aprotinin मुळे रुग्णाच्या शरीरामध्ये SARS-CoV-2  चा संसर्ग बंद होतो आणि इंफेक्शनमुळे झालेले सेल्स कमी होण्याचे प्रमाण आटोक्यात येते. (कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी BCG Vaccine वृद्धांसाठी फायदेशीर ठरेल; ICMR च्या अभ्यासातून खुलासा)

युके मधील University of Kent चे लेखक Martin Michaelis यांनी सांगितले की, aprotinin aerosol हे influenza  झालेल्या रुग्णांविरुद्ध खूप चांगल्या पद्धतीने काम करते. या औषधामध्ये कोविड-19 विरुद्ध लढण्याची क्षमता देखील आहे. कोविड-19 झालेल्या रुग्णांना सुरुवातीच्या काळात हे औषध दिल्यास त्यांची प्रकृती लवकर सुधारु शकते.

Aprotinin मध्ये TMPRSS2 gene रोखण्यासाठी समर्थ ठरत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे इन्फ्लूएंझा व्हायरस आणि कोरोना व्हायरस वरील उपचार म्हणून ते सुचविण्यात आले. दरम्यान, आम्ही SARS-CoV-2 विरुद्ध या औषधाचे होणारे परिणाम तपासले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

SARS-CoV-2 विषाणू विरुद्ध लढण्यास aprotinin हे औषध सक्षम असून शरीरातील वेगवेगळ्या प्रकराच्या सेल्स (Caco2, Calu-3, and primary bronchial epithelial cell air-liquid interface cultures) वर याचा परिणाम दिसून आल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.  त्याचबरोबर aprotinin aerosol हे औषध दिल्यानंतर रुग्णांच्या शरीरातील SARS-CoV-2 चा प्रसार रोखण्यास मदत होईल आणि कोविड-19 मुळे रुग्ण इतर आजारांना रुग्ण बळी पडणार नाहीत.