Coronavirus: जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणजे काय? WHO ती का जाहीर करते?
Coronavirus:Global Health Emergency | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना वायरस (Coronavirus) जगभराती अनेक देशांमध्ये आपला प्रादुर्भाव वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) ने जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) घोषित केली आहे. कोरोना वायरस लागण झाल्याने चीनमध्ये (China) आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर, जगभरातील विविध देशांमध्येही या विषाणूची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य सघटनेने आरोग्य आणीबाणी घोषीत केले म्हणजे नेमके काय केले? हे आपणास माहिती आहे काय?

जागतिक आरोग्य आणिबाणी म्हणजे काय?

जागतिक आरोग्य आणिबाणी म्हणजे एखाद्या देशात निर्माण झालेल्या आणि मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या कोणत्याही विशिष्ट आजार, अथवा घटनेचा प्रभाव संपूर्ण जगावर अथवा जगभरातील काही देशांवर पडतो. ज्यामुळे निष्पाप नागरिकांचे हाकनाक बळी जातात, त्यांना आरोग्यविषयी समस्या निर्माण होतात. अशा वेळी डब्लूएचओ जागतिक आरोग्य आणीबाणी घोषीत करते. जेणेकरुन जगभरातील देश तो आजार किंवा घटनेबाबत अधिक दक्ष होऊन उपाययोजना करतात. तसेच, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकमेकांना मदत करतात. एखाद्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पावले उचलावी लागतात तेव्हा WHO जागतिक आणिबाणी घोषीत करते.

WHO कोरोना व्हायरसबद्दल अधिक गंभीर?

जागतिक आरोग्य आणिबाणी लागू केल्यानंतर जगभरातील देश WHO मिळून संयुक्तरित्या काही पावले उचलतात. ही पावले उचलण्यासाठी WHO कडे आपत्कालीन निधीही असतो. ज्याचा वापर त्या आजरावर नियंत्रण करण्यासाठी होणाऱ्या खर्चावर केला जातो. कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे सुमारे 11 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका निधी आहे. या व्हायरसचा निपटारा करण्यासाठी आणखीही फंड उपलब्ध करुन दिला जाईल, असे डब्लूएचओने म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus Precautionary Advisory: जीवाघेण्या कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून खास सूचना जारी; अशी घ्या काळजी!)

WHO ची मार्गदर्शक तत्वे बंधनकारक

WHO मध्ये जगभरातील जवळपास सर्व म्हणजे 196 देश आहेत. हे सर्व देश WHO च्या नियमांनी बद्ध असतात. त्यांना WHO चे नियम पाळावे लागतात. जागतिक आरोग्य आणीबाणी असते त्या वेळी तर या देशांवर अधिक जबाबदारी असते. कारण, अशा वेळी WHO मल्टी डायरेक्शनल रिस्पॉन्स च्या माध्यमातून रोगाला आटकावर करण्याचा प्रयत्न करते. ज्यात प्रवास, रुग्ण, प्रदेश, देशांच्या सीमा, आंतरराष्ट्री, राष्ट्रीय विमानतळ, आदी ठिकाणांवर विशेष मार्गदर्शक तत्वे घालून दिली जातात.

अशा प्रकारे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषीत करण्याची WH0ची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जुलै 2019 मध्येही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. अफ्रीका देशात इबोला व्हायरस पसरल्यानंतर तो आटोक्यात आणण्यासाठी डब्लूएचओने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषीत केली होती.पोलीओ नियंत्रणात आणण्यासाठीही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषीत करण्यात आली होती.