Corona Vaccine | | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमण नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरण (Corona Vaccine) सुरु आहे. सर्व प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) केले जात आहे. मात्र, लहान मुलांना कोरोना लस द्यावी की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. हा संभ्रम लवकरच दूर होणार आहे. खास लहान मुलांसाठी आता कोरोना लस निर्मीती केली जाणार आहे. फायजर (Pfizer) कंपनीकडून त्याबाबत चाचणीही सुरु करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, फायजर या अमेरिकन औषध कंपनीने 12 वर्षांखालील मुलांचे कोरोना लसीकरण करण्यसाठी एक विशीष्ठ प्रकारची लस निर्मीती केली आहे.

सध्या या लसीची मानवी चाचणी सुरु आहे.

सध्यास्थितीमध्ये 16 वर्षे पूर्ण असलेल्या कोणत्याही व्यक्तीस कोरोना लस घेता येते. त्यामुळे ज्याची 16 वर्षे पूर्ण नाहीत त्यांचे काय हा प्रश्न उपस्थित होतो. याच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी फायजरने लस निर्मिती केल्याचे समजते. फायजरच्या प्रवक्त्यांच्या हवाला देऊन दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, लहान मुलांसाठी केल्या जात असलेल्या लसनिर्मीतीसाठी स्वयंसेवकांनापहिला डोस बुधवारी देण्यात आला.अमेरिकेत सध्या फायजर-बायोएनटेकची लस 16 वर्षांवरील व्यक्तींना देण्यात येते आहे. अमेरिकेत कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आतापर्यंत तिथे 6.6 कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. (हेही वाचा, Nagpur Covid 19 Fresh Guidelines: वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्शवभूमीवर होळी सेलिब्रेशन वर नागपूरात कडक निर्बंध; पहा 28-29 मार्च दिवशी हॉटेल,भाजी मंडई, चिकन शॉपच्या वेळांसाठी अशी नियमावली)

फायजरने पुढे म्हटले आहे की, लहान मुलांसाठी निर्माण केलेली लस ही एकूण तीन डोसमध्ये देण्यात येईल. सध्यास्थितीत या लसीचे दोन डोस दिले जात आहेत. लहान मुलांसाठी निर्माण केलेल्या लस चाचणीच्या सुरुवाचीच्या टप्प्यात आतापर्यंत 144 मुले सहभागी झाली आहेत. पुढच्या टप्प्यासाठी 4500 मुलांचा समावेश होणार आहे असे कंपनीचे नियोजन आहे.

कोरोना चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या मुलांवर होणारा परिणाम, रोगप्रतिकारकशक्ती, मुलांची लस सहण करण्याची क्षमता आदी गोष्टी तपासण्या येणार आहेत. या लसीचे टप्पे येत्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण होतील. त्यानंतर ही लस बाजारात येऊ शकेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.