Nagpur Covid 19 Fresh Guidelines: वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्शवभूमीवर होळी सेलिब्रेशन वर नागपूरात कडक निर्बंध; पहा 28-29 मार्च दिवशी हॉटेल,भाजी मंडई, चिकन शॉपच्या वेळांसाठी अशी नियमावली
Holi colours (Photo Credits: Pexels)

महाराष्ट्रात मुंबई, पुणे सह नागपूर शहरामध्येही कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये चिंताजनक वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी नवा उच्चांक गाठत असलेला आकडा पाहून आता प्रशासनाने नियम कडक करण्यास सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता नागपूर शहरामध्ये होळी सेलिब्रेशन साठी गर्दी होऊ नये म्हणून 28-29 मार्च साठी जिल्हाधिकार्‍यांकडून खास नियमावली जारी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत होळी, धुलिवंदन आणि शब-ए-बारात साजरा केला जाणार आहे. Holi 2021: पुणे जिल्ह्यात यंदा होळी, धुळवड नाही, कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मनाई आदेश.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नवी नियमावली जारी केली आहे.

- होळीच्या दिवशी म्हणजे 29 मार्चला नागपूरामध्ये मार्केट, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद राहणार आहे.

- भाज्या, मटण, चिकन शॉप हे सकाळी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.

-28 आणि 29 मार्च दिवशी लोकांना रस्त्यावर एकत्र जमण्यासाठी परवानगी नसेल.

नागपूर शहरामध्ये काल दिवसभरात 3,579 जणांना कोरोना संक्रमण झाल्याची माहिती देण्यात आली आहे तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेऊन काल दिवसभरात 2,285 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

नागपूर  प्रमाणेच पुणे, मुंबई शहरातही महापालिकेकडून कडक नियमावली जारी करण्यात आली आहे.