Holi |

तुम्ही जर पुण्यात राहात असाल आणि तुम्हाला जर यंदा होळी (Holi ) किंवा धुलीवंदन (Dhulivandan ) साजरे करायचे असेल तर थांबा. आगोदर ही बातमी वाचा. यंदा पुण्यात होळी (Holi 2021) किंवा धुलीवंदन (Dhulivandan 2021) साजरे करता येणार नाही. होय, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच, त्याबाबत आदेशही दिलो आहेत. जे लोक आदेशाचा भंग करताना आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.कोरोना व्हायरस महामारीच्या (Coronavirus Epidemic) पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे ही संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाचा एक भाग म्हणून यंदा पुणे जिल्ह्यात होळी, धुलीवंदन असे पारंपरीत सण साजरे करण्यावर बंदी घातली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजच (24 मार्च) याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (हेही वाचा, BMC Guidelines for Holi 2021: यंदा मुंबईत धुलिवंदन नाही! कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी बीएमसीने जारी केले आदेश)

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार पुणे शहर आणि जिल्हा अशा सर्व ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी (28 मार्च 2021) दिवशीआणि धूलीवंदन (29 मार्च 2021) या दिवशी गर्दी करता येणार नाही. उत्सव साजरे करता यणार नाहीत.