Coronavirus उपचारादरम्यान Ivermectin औषधाच्या वापरावरुन WHO कडून पुन्हा एकदा गंभीर इशारा
Soumya Swaminathan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांवर उपचारादरम्यान करण्यात येत असलेल्या आइवरमेक्टिन (Ivermectin) औषधाच्या वापरावरुन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) पुन्हा एकदा इशारा दिला आहे. Ivermectin हे एक आइवरमेक्टिन पैरासिटिक संक्रमण (Ivermectin Parasitic Infections) झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाणाऱ्या औषध आहे. या औषधाचा वापर हा कोविड 19 संक्रमित रुग्णांवर उपचारादरम्यान केला जात आहे. डब्ल्यूएचओ (WHO) चे मुख्य संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'कोणत्याही नव्या आजारादरम्यान वापरली जाणारी औषधांची सुरक्षीतता आणि प्रवावशक्ती आवश्यक असते. सौम्या स्वामीनाथन क्लीनिकल ट्रायलच्या इतर कोविड उपचारंमध्ये केल्या जाणाऱ्या आइवरमेक्टिन औषधाच्या वापराविरुद्ध आहे. '

केवळ जागतिक आरोग्य संघटनाच नव्हे तर जर्मन हेल्थकेअर आणि लाइफ सायन्सेस (German Healthcare and Life Sciences) च्या Merck यांच्याद्वारेही इशारा देण्यात आला आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांनी हे ट्विटरही शेअर केले आहे. या ट्विटमध्ये Merck यांनी म्हटले आहे की, त्यांचे संशोधक हे कोविड उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या आइवरमेक्टिन औषधाच्या वापरावर सातत्याने अभ्यास करत आहेत. एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, आमच्या अभ्यासत पुढे आले आहे की, प्री-क्लिनिकल स्टडीजमध्ये कोविडच्या उपचारांमध्ये या औषधाच्या प्रतिसादाबद्दल अद्याप कोणताही वैज्ञानिक आधार नाही. कोणतेही क्लीनिकल सुरक्षा किंवा प्रभाव आढलून आला नाही. अभ्यासात विशेष आशादाही चित्रही पुढे आले नाही.

WHO ने कोविड संक्रमित रुग्णांवरील उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या आइवरमेक्टिन औषधाच्या वापराबाबत पाठिमागील दोन महिन्यांमध्ये दिलेला हा दुसरा इशारा आहे. या आधी मार्च महिन्यामध्ये WHO म्हटले होते की, या औषधामुळे रुग्णाचा मृत्यूपासून बचाव किंवा रुग्णांचे रुग्णालयांमध्ये दाखल होण्याच्या प्रमाणामध्ये घट होण्याबाबत फारत कमी शक्यता आहे. त्यामुळे हे औषध आतापर्यंत तरी कोरोना उपचारावर गुणकारी असल्याचे पुढे आले नाही. (हेही वाचा, Coronavirus In India: भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएंटवर WHO द्वारा अद्याप कोणताच निर्णय नाही)

गोवा सरकारने कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान आइवरमेक्टिन औषध वापरास परवानगी नुकतीच दिली आहे. त्यानंतर काही अवधीमध्येच डॉक्टर स्वामीनाथन यांचे हे ट्विट आले आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे की, युनाटेड किंग्डम, इटली, स्पेन आणि जपानच्या तज्ज्ञांनी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर घटण्यात, तसेच बरे होण्यात आणि कोरोना संक्रमण कमी करण्यात या औषध महत्त्वाचे ठरल्याचे म्हटले आहे. त्यानंतरच या औषधाच्या वापरास गोव्यात मान्यता दिल्याचे म्हटले आहे. गोवा सरकारच्या निर्णयानुसार 18 वर्षांवरील सर्व रुग्णांना पाच दिवसांपर्यंत नियमीत 12mg आइवरमेक्टिन दिले जाणार आहे.