Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Heart Attacks: हृदयविकाराचा धोका जागतिक स्तरावर झपाट्याने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जीवनशैली आणि आहारातील विस्कळीतपणामुळे हृदयाच्या समस्या झपाट्याने वाढल्या आहेत. कोरोनाच्या धोक्यामुळे ते अधिक गंभीर झाले आहे. काही दशकांपूर्वीपर्यंत, हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या वृद्धत्वाशी निगडीत समस्या म्हणून ओळखल्या जात होत्या. परंतु, आता तरुण लोक देखील त्याचे बळी ठरत आहेत. अशाच एका ताज्या प्रकरणात, गुजरातमध्ये एका सहाव्या वर्गातील मुलाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्याचे वय फक्त 12 वर्षे होते. एवढ्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवभूमी द्वारका आणि राजकोट शहरात अनुक्रमे 12 वर्षीय आणि 20 वर्षांच्या मुलाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सहावीत शिकणाऱ्या मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की त्यांनी कोविडची लस घेतली नव्हती, मात्र यामागे कोरोनाचा संसर्ग कारणीभूत आहे की नाही? याची सध्या पुष्टी झालेली नाही. तरुणांमध्ये हा जीवघेणा आजार का वाढत आहे आणि ते रोखण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात हे जाणून घेऊयात? (हेही वाचा - Weight-loss Injection: आता इंजेक्शन घेऊन कमी करू शकता लठ्ठपणा; ब्रिटनमध्ये झाले लाँच, जाणून घ्या सविस्तर)

तरुण वयात हृदयविकाराची समस्या -

आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकाराची समस्या खूप गंभीर बाब आहे. त्यासाठी विशेष दक्षतेची गरज आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत, हृदयविकाराचा झटका ही समस्या मुख्यत्वे वृद्ध लोकांमध्ये होती. 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या अत्यंत दुर्मिळ मानल्या जात होत्या. मात्र, आता हृदयविकाराच्या प्रत्येक 5 रुग्णांपैकी 1 रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. 20-30 वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका देखील सामान्य होत आहे. 2000-2016 दरम्यान या तरुण वयोगटातील हृदयविकाराचा झटका दर वर्षी 2% वाढला आहे.

अमर उजालाशी बोलताना दिल्लीचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुयश निरंजन यांनी सांगितलं की, अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराची प्रकरणे वाढत आहेत. कोरोना संसर्गामुळे हृदयाच्या आरोग्यावरच गंभीर परिणाम झालेला दिसत नाही, तर जीवनशैलीतील गडबडीमुळे निर्माण झालेल्या काही समस्यांमुळे हृदयविकाराचा धोकाही वाढला आहे. लठ्ठ व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो, असेही यापूर्वीच्या संशोधनात आढळून आले आहे.

उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचा धोका वाढवण्याचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांसाठी हा एक मोठा धोका मानला जातो. जास्त वजन असण्याची समस्या देखील उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढण्याचा धोका असतो.